भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गाचेही भूसंपादन थांबवले

स्थानिक

स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधानंतर निर्णय 

शक्तिपीठ महामार्गापाठोपाठ भक्तीपीठ महामार्ग आणि औद्योगिक

महामार्गालाही ब्रेक लागलाय. स्थानिक शेतकऱ्यांनी भूसंपादनाला

Related News

विरोध केल्याने या तीनही महामार्गांचं भूसंपादन थांबवण्यात आलंय.

नागपूर गोवा असा शक्तिपीठ महामार्ग होणार होता. पुणे नाशिक

औद्योगिक महामार्गा तर सिंदखेड राजा ते शेगाव असा भक्तीपीठ

महामार्ग होणार होता. या तीन महामार्गांची जवळपास सव्वालाख कोटी

रूपयांची गुंतवणूक होती. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर हे तीन महामार्ग

उभारण्यात येणार होते. शक्तीपीठ, भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्ग

हा महायुती सरकारचा सर्वात महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जात

होता. आता या तीन्ही महामार्गाच भूसंपादन थांबवण्यात आलं आहे.

राज्यातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यात या तीन ही महामार्गाची

महत्वाची भूमिका होती. मात्र भूसंपादनाला स्थानिक शेतक-यांनी विरोध केल्यानंतर

एमएसआरडीसीने भूसंपादन थांबवलय. तिन  महामार्ग सध्या वादाच्या भोवऱ्यात

अडकल्याने सरकारला बॅकफूटवर जावं लागलं आहे. शक्तीपीठ महामार्गामध्ये

राज्यातील 27 हजार हेक्टर जमिनी अधिग्रहित करण्याची योजना होती. मात्र

शेतकऱ्यांच्या विरोधानंतर राज्य सरकारनं एक पाऊल मागे घेत मोठा निर्णय घेतला आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/tension-rises-between-pakistan-and-afghanistan/

Related News