पाकिस्तान – अफगाणिस्थान मध्ये तणाव वाढला

पाकिस्तान

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सीमावाद वाढत चालला आहे.

मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य आणि तालिबानमध्ये

संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. तालिबानने डूरंड लाइनजवळ

Related News

नवीन सैन्य चौक्या स्थापन केल्या आहेत. या चौक्यांच्या माध्यमातून

तालिबान पाकिस्तानी सैन्याला चिथावणी देत आहे. मंगळवारी सकाळी

तालिबानने अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात डांगम भागात पाकिस्तानी

सीमेजवळ नवीन चौक्या निर्माण केल्या. पाकिस्तानी सैन्यावर दबाव

टाकण्यासाठी या सैन्य चौक्यांची निर्मिती करण्यात आलीय. याआधी

सुद्धा मागच्या काही दिवसात तालिबान आणि पाकिस्तानात सैन्यात झडपा

झाल्या आहेत. या तणावादरम्यान अशांत खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या सीमा

भागात पाकिस्तानी सैन्यासोबत हिंसक झडप झाली. यात दोन प्रमुख कमांडरसह

आठ अफगाण तालिबानी मारले गेले. खुर्रम सीमावर्ती जिल्ह्यात झालेल्या

गोळीबारात 16 अफगाणि तालिबानी सैनिक जखमी झाले. डॉन वर्तमानपत्रानुसार,

अफगाण तालिबानने 7 सप्टेंबरला सकाळी पाक-अफगाणिस्तान सीमेवर

पालोसिन क्षेत्रात बऱ्याच मोठ्या शस्त्रसाठ्यासह पाकिस्तानी चेकपोस्टवर हल्ला केला.

Read also: https://ajinkyabharat.com/daya-abhijeet-scp-pradyuman-again-introduced-the-audience/

Related News