मुंबईत गणपती विसर्जनासाठी यावर्षी 200 हून अधिक कृत्रिम तलाव 

Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी

गणेश चतुर्थी च्या उत्सवाला काही दिवसांचा कालावधी बाकी आहे.

अशातचं आता मुंबई महानगरपालिका रस्त्यांची दुरुस्ती आणि नागरिकांना

Related News

विसर्जनाच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तयारी करत आहे.

यंदा गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी

कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हे कृत्रिम तलाव

गुगल मॅप वर सूचीबद्ध केले जाणार आहे. यामुळे नागरिक गुगल मॅपवर

आपल्या परिसरातील कृत्रिम तलाव शोधू शकतात.

ज्यामुळे सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळता येणार आहे.

यासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेने माहिती दिली आहे.

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी गणेशोत्सवात गणेशमूर्ती विसर्जनासाठी

कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्यात येणार असून संपूर्ण मुंबईत 204

कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून

कृत्रिम तलावात विसर्जनसाठी गणेश भक्तांकडून प्रतिसाद वाढत आहे.

तथापी, गेल्या अकरा वर्षांत कृत्रिम तलावातील गणेश विसर्जनाच्या

प्रमाणात तब्बल 371 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा 200 हून

अधिक कृत्रिम तलाव उभारले जातील आणि लोकांना तसेच गणेश मंडळांना

त्यांचा वापर करण्यास आणि पर्यावरणपूरक उत्सवात सहभागी होण्यासाठी

प्रोत्साहित केले जाईल, असे नागरी संस्थेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/vaidharbiya-nath-samaj-sangh-office-bearers-wish-for-death-wish-and-demand-for-permission/

Related News