मनोज जरांगे आणि अब्दुल सत्तारांमध्ये 3 तास चर्चा!

मंत्री अब्दुल

मंत्री अब्दुल सत्तार यांनी मध्यरात्री मनोज जरांगे यांची घेतली भेट

अंतरवाली सराटीमधून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेनेचे मंत्री

अब्दुल सत्तार यांनी बुधवारी मध्यरात्री मराठा आरक्षण आंदोलक मनोज

Related News

जरांगे पाटील यांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल तीन तास बैठक झाली,

या बैठकीनंतर दोघांनीही पत्रकार परिषद घेतली. जुळवाजुळव करण्याचा

प्रयत्न केला, मात्र जरांगे पाटील यांच्या मनात काय आहे? ओळखता येणे

कठीण आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री अब्दुल सत्तार यांनी या बैठकीनंतर दिली आहे.

राज्याचे अल्पसंख्याक पणन मंत्री अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगे पाटील

यांच्यात तीन तास बैठक झाली. ही बैठक पहाटे तीन वाजता संपली. मनोज जरांगे हे

तळागाळातील शेवटच्या माणसांचे प्रतिनिधित्व करीत आहेत. तीन तासात मी

विधानसभेत आपले काही जमते का म्हणून जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला,

मात्र त्यांच्या मनात काय चालले आहे हे मी ओळखू शकलो नाही आणि जुळवू

सुद्धा शकलो नाही. भविष्यात बघू काय होते, असं सत्तार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आज मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांचे

नुकसान पाहिले आहे. मी सुद्धा शेतकऱ्यांचे नुकसान पाहिले, नुकसान झालेले आहे.

त्यामुळे आज होणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये मी मनोज जरांगे पाटील यांची

सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी मुख्यमंत्री आणि कॅबिनेट बैठकीत मांडणार

असल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/jaideep-aptela-malvan-police-station-area/

Related News