खामगाव: शाळेत शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग

'पोक्सो

‘पोक्सो’ सारख्या प्रकरणात पोलिसात तक्रार कराण्याऐवजी

शिक्षकास शिफ्ट बदलून दिली शिक्षा

प्राचार्य व संचालक पालकांना इमोशनल बँकमेल करून प्रकरण दाबण्याच्या प्रयत्नात

Related News

भारतीय संस्कृतीत आई-वडिलानंतर आदराचे, विश्वासाचे आणि पुजनियस्थान

कुणाला दिल्या जात असेल तर ते म्हणजे गुरूजणांना!, ‘गरु साक्षात परब्रम्हा’

म्हटलंय ते उगाचचं नव्हे. आई वडिलांनंतर जास्त वेळ मुलं कोणासोबत घालवित

असतील तर ते म्हणजे शिक्षक. शिक्षक आणि विद्यार्थिनींचे नाते म्हणजे पवित्र

आणि पुजनीय असे असायला हवे. मात्र आज-कालच्या शिक्षकांना झाले तरी काय ?

आपल्या मुलींप्रमाणे किंबहून त्याच्या सख्या मुलींपेक्षाही कमी वयाच्या मुलींवर या

शिक्षकांची वाईट नजर पडत आहे. महाराष्ट्रात शिक्षण घेणाऱ्या मुलीं सुरक्षित

नसल्याच्या घटना समोर येत आहे. असाच प्रकार खामगाव शहरातील एका नामांकित

शाळेत घडल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. या शाळेतील शिक्षकाने एका

अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याने संताप व्यक्त होत आहे. खामगाव शहरात

शिक्षण क्षेत्रात अनेक उंच शिखर सर करीत ‘नॅशनल’ स्थरावरती झेंडा फडकविणारे

विद्यार्थि घडवीण्याची परंपरा कायम राखत असतांना नावलौकीकास काळा डाग

लावण्याचे काम अनेक वर्षांपासून हा वासनांध शिक्षक करित आहे. मोटार सायकलवर

अप-डाऊन करणारा धुंद अवस्थेत मोटार सायकलवर उडत्या चालिचे “गिते”

गात अगदी तरूण असल्यासारखा वागणारा हा वासनांध शिक्षक विद्यार्थिनींसोबत अनेक

वेळा अंगलटपणा करून त्याच्या शरिराला स्पर्श करत असल्या अनेक तक्रारी यापूर्विही

आलेल्या आहेत. अनेक प्रकरणात या शिक्षकाला संचालकांनी संस्थेची बदनामी होवू नये

म्हणून अभय दिल्याचे काही माजी संचालकांचे म्हणने आहे. शहरातील एका नामांकित

शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींसोबत असा प्रकार होत असल्याने आणि त्यांच्या

मुलीसुध्दा याच शाळेत शिक्षण घेत असल्याने या शिक्षकाला शिक्षा होणे गरजेच आहे.

उद्या दुसऱ्याकुण्या मुलीकवर अतिप्रसंग झाल्यास पश्चाताप नको म्हणून पालकांनी सदर

प्रकार उघड करण्याची विनंती अजिंक्य भारतच्या टिमकडे केली. शहरातील अनेक

मुली या शाळेत शिक्षण घेत आहेत. शाळेत मुलींची सुरक्षेची जबाबदारी असलेले शिक्षकच

जर का मुलींचा विनयभंग करित असतील तर त्या नराधम शिक्षकाला शिक्षा होणे अनिवार्य आहे.

सदर प्रकरणात शिक्षकास अल्पवयीन मुलिचा विनभंग केला आहे. कायदया अंतर्गत

या प्रकारणाची रितसर तक्रार प्राचार्य यांनी पोलिसात देणे बंधनकार असतांना सुध्दा

मॅनेजमेंट व प्राचार्य यांनी कायदा झुगारून स्वःता न्यायाधिस बनन्याचा प्रयत्न केला शिक्षकाची

आणि जणू शिफ्ट बदलून सर्वात मोठी शिक्षा दिली. याप्रकारामुळे शिक्षकाला पाठीशी

घालण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासनाने, तसेच शिक्षण विभागातील

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकरणाची गंभिर दखल घेवून शिक्षकास निलंबीत करून कायदेशीर कारावई

करावी अशी मागणी पालकांकडून होत आहे. प्राचार्य यांचे सोबत संपर्क साधला असेल त्यांनी

प्रकाराला दुजोरा दिला. शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला. त्यामुळे चिडलेल्या

पालकांनी शिक्षकाला शाळेत येवून चोप दिला, प्राचार्य यांनी मधे बचाव करून शिक्षकाची

बाजू घेवून स्वता न्यायाधीस बनन्याचा प्रयत्न केला. प्राचार्य आणि वासनांध शिक्षकाचे काही सहकारी

मित्र शिक्षकांनी बचावात्मक पवित्रा घेवून विद्यार्थिनीच्या आई-वडीलांना ईमोशनल बॅकमेल करून

याप्रकरणात विद्यार्थिनीची सुध्दा बदनामी होण्याची भीती दाखवत प्रकरण दडपण्याचा

प्रयत्नात असल्याचे दिसत आहे.

शिक्षकाला पालकांनी दिला चोप

विनयभंग केलेल्या शिक्षकांला विद्यार्थिनिंच्या पालकांनी चांगलाच चोप दिला असून

दुचाकिवर येतांना जे ‘गिते’ गात असेल त्यांची आठवण निश्चितच करून दिली

आहे. या शिक्षकाचे अकोला कनेक्शन सुध्दा वादग्रस्त असून काही दिवसांपूर्वी गुन्हे

दाखल झाले होते अशी  माहिती सुध्दा समोर आली आहे. त्यामुळे हा शिक्षक

चारित्रहीन असून, असा प्रकार विद्यार्थिनीसोबत सुध्दा होवू शकता यांची कल्पना

संचालकांना होती तरीही बाला सुट का देण्यात आली असा प्रश्न या निमीत्ताने

उपस्थित होत आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/purprakatchya-madatila-dhawala-sonu-sood/

Related News