राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर केंद्रीय
अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआय ने नवा गुन्हा दाखल केला आहे.
Related News
ड्रोनच्या नजरेतून ‘ऑपरेशन क्लीन’
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
खडकीत माणुसकीचं दर्शन:
गुंगीचे औषध देऊन विवाहितेचे लैंगिक शोषण:
पाकिस्तानच्या हाती असलेले अण्वस्त्र सुरक्षित आहेत का?
भारताच्या एअर स्ट्राईकनं पाकच्या चिंध्या-चिंध्या…
“परी आहे मी”… अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा ग्लॅमरस अंदाज!
IPL 2025: किती परदेशी खेळाडू IPL साठी परत येणार?
जगातील सर्वात गरीब राष्ट्रपती, कधीच राष्ट्रपती भवनात राहिले नाहीत…
चाकणमध्ये महिलेला फरफटत निर्जनस्थळी नेऊन बलात्कार;
जम्मू-कश्मीरमध्ये ‘शोधून शोधून ठोकलं’;
छत्रपती संभाजीनगरमध्ये दरोडेखोरांचा कहर:
गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी मंत्रीपदाचा
गैरवापर करत तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा
देशमुख यांच्यावर आरोप आहे. गुन्हा दाखल होताच देशमुख यांनी
एक्स वरुन तत्काळ प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये विद्यमान उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले आहेत. विधानसभा निवडणूक
तोंडावर असतानाच देशमुखांवर दाखल झालेल्या गुन्ह्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरु आहे.
सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये अनिल देशमुख आरोपी आहेत.
याच गुन्ह्यात विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण आणि इतरांना आगोदरच
आरोपी करण्यात आले आहे. पोलीस अधिकारी प्रवीण मुंढे यांनी दिलेल्या जबाबावरुन
हा गुन्हा दाखल झाला आहे. मुंढे यांचा जबाब देशमुख यांच्या विरोधात आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमध्ये देशमुख मंत्री असताना गिरीश महाजन
यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देशमुख यांचे नाव घेत आरोप केला आहे.
आपल्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर देशमुख दबाव टाकत
असल्याचे म्हटले होते. सीबीआयने गुन्हा दाखल करताच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म
X वर एक पोस्ट करत अनिल देशमुख यांनी म्हटले आहे की, धन्यवाद! देवेंद्र फडणवीस,
”माझ्यावर CBI कडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे.
जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान
सुरू झाले आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही.
न झुकता – न डगमगता मी BJP च्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/balapur-telhara-talukyat-damage-to-fields-due-to-rain/