पुंडा तालुक्यातील बांबर्डा बू या गावात पंधरा दिवसांपासून नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. गावातील काही भागात पाणीपुरवठा होत असला तरी, प्रेशर कमी असल्यामुळे आणि बायपास पद्धतीने पाणी पुरवल्यामुळे अनेक लोक पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. जीवन प्राधिकरणाने नियुक्त केलेले कंत्राटी कर्मचारी गावकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
ज्या दिवशी गावाला पाणीपुरवठा मिळतो त्या दिवशी नळ चालू असला तरी प्रेशर कमी आणि बायपास पद्धत असल्यामुळे काही लोकांना पाणी मिळत नाही. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, “काही लोक तुपाशी तर काही लोक उपाशी” अशा परिस्थिती निर्माण झाली आहे.
निवेदनातील मुख्य बाबी
गावाला पाणी पुरवठा असला तरी कमी प्रेशरने आणि बायपास पद्धतीने दिले जाते, त्यामुळे अर्ध्या गावाला पाणी मिळत नाही.
Related News
संबंधित कंत्राटी कर्मचारी गावाच्या दिवशी दुसऱ्या गावात पाणीपुरवठा सुरू ठेवतात.
कर्मचारी यांच्यावर तत्काळ कारवाई करावी आणि पाणीपुरवठा सुरळीत करावा, असे ठरावात नमूद करण्यात आले आहे.
ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया
संदीप धर्माळे, प्रभारी सरपंच, बांबर्डा बू:
“मी चार ते पाच दिवसांपासून प्राधिकरणाच्या ऑफिसमध्ये धावपळ करतोय, परंतु कर्मचारी दिसून येत नाहीत. राऊत सर यांना फोन केला तरी ते उचलत नाहीत. आम्ही आमच्या गावची समस्या कोणाकडे मांडू, हा यक्षप्रश्न झाला आहे.”
कविता सूर्यवंशी, महिला बांबर्डा बू:
“पाणीपुरवठा बंद असल्यामुळे आम्हाला तलाव आणि हापशी यावर अवलंबून राहावे लागते. विकतचे पाणी घेण्याची वेळ आमच्यावर आली आहे. आम्हाला पाणी न दिल्यास संपूर्ण कुटुंब प्राधिकरणाच्या ऑफिसमध्ये येऊन बसू.”
पूनम धर्माळे, ग्रामपंचायत सदस्य, बांबर्डा बू:
“आम्ही १५ दिवसांपासून तहानलेले आहोत, परंतु प्रशासन फक्त आश्वासन देत आहे. जर पुढील दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर आम्ही तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढू,” असे गावातील महिलांनी इशारा दिला आहे.ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, संबंधित विभागाने तात्काळ गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, अन्यथा या गावातील नागरिकांचे हाल होत राहतील.
read also : https://ajinkyabharat.com/pm-modis-comment-on-tmc-government-for-ignoring-the-president/
