आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील गुडलावल्लेरू अभियांत्रिकी महाविद्यालयात
मुलींच्या वसतिगृहाच्या वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा आढळून आल्याचा
धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाची
Related News
मूर्तिजापूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये बाल वारकऱ्यांची दिंडी, रिंगण सोहळ्याने भाविक मंत्रमुग्ध
आषाढी एकादशी विशेष बातमी | अकोला ३२० वर्षांच्या परंपरेचे साक्षीदार विठ्ठल मंदिरात पहाटे महापूजा | ९२ वर्षांची अखंड हरिनाम परंपरा
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
भावना निर्माण झाली. संतप्त विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आवारात मोठ्या
प्रमाणावर निदर्शने केली. धक्कादायक घटनेचा एक व्हिडिओ कथीतरित्या
विद्यार्थ्यांमध्ये सोशल मीडियातून व्हायरल झाला. ज्यामुळे कॅम्पसमध्ये आणखी
तणाव वाढला असून, प्रशासन आणि पोलिसांकडून विद्यार्थ्यांना शांततेचे अवाहन
करण्यात आल्याचे समजते. गुडलावल्लेरू अभियांत्रिकी महाविद्यालयात
वसतिगृहाच्या वॉशरुममध्ये छुपा कॅमेरा असल्याचे एका मुलीला आढळून आले.
त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली. घडलेली घटना समजताच विद्यार्थ्यांनी
गुरुवारी रात्री मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली. घडल्या प्रकारामुळे महाविद्यालयातील
सुरक्षितता आणि गोपनीयतेबद्दल गंभीर चिंता निर्माण होत आहेत.
संतप्त विद्यार्थ्यांनी त्वरित कारवाई आणि न्यायाची मागणी केली आहे.
प्ररसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, छुप्या कॅमेऱ्याने रेकॉर्ड केलेले काही व्हिडिओ
कथितपणे मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये सामायिक केले गेले. ज्यामुळे परिस्थिती
आणखीनच चिघळली. घटनेची माहिती पसरताच, विद्यार्थी कॅम्पसमध्ये जमा झाले,
त्यांनी रात्रभर निदर्शने केली आणि जबाबदारीची निश्चित करण्याची मागणी केली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस इंजिनीअरिंग कॉलेज कॅम्पसमध्ये दाखल झाले
आणि त्यांनी तपास सुरू केला. गुप्त कॅमेऱ्याच्या संदर्भात अंतिम वर्षाच्या एका विद्यार्थ्याला
ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणात अद्याप तरी कोणाला अटक करण्यात
आली नाही. या घटनेशी संबंधित सर्व व्यक्तींना अटक करून त्यांना जबाबदार धरण्यात यावे,
अशी पीडित विद्यार्थ्यांची मागणी आहे.
मणीपूर, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रानंतर
आता आंध्र प्रदेशही महिलांवरील लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि गैरवर्तनांच्या
घटनेमुळे चर्चेत आले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/nagpurat-silent-movement-by-ajit-pawar-group/