मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

मूर्तिजापूर

मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोला, अमरावती व वाशिम या तीन जिल्ह्यांतून या तिन्हींना एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये गुन्हेगारांचे नाव असे आहे: नितेश ऊर्फ निलेश प्रभाकर थोप (वय ३८, रा. खरब ढोरे), आनंद निर्दोष घोसले (वय २८, रा. सिरसो गायरान) आणि कादरखान ऊर्फ कादर शेख गफार खान (वय ३०, रा. धोत्रा शिंदे).

या तिन्ही आरोपींविरुद्ध विविध पोलिस स्टेशनमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. यात गोवंश व जनावरांची चोरी, खून, गंभीर दुखापत, प्रतिष्ठित नागरिकांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून ब्लॅकमेल करणे, खंडणी मागणे, अंमली पदार्थ व घातक शस्त्रे बाळगणे, चैन स्नॅचिंग व सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणे यांसारखे गुन्हे आहेत. वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करूनही त्यांची वर्तणूक सुधारली नसल्यामुळे, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६ नुसार तडीपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी व दंडाधिकारी श्री संदिप अपार यांच्याकडे सादर केला गेला आणि कायदेशीर पडताळणीनंतर मंजुरी मिळाली.

ही कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस पथकात ठाणेदार श्रीधर गुट्टे, पोउपनि चंदन वानखडे, मपोउपनि मनिषा सामतकर, एएसआय दीपक कानडे, संजय खंडारे, मनीष मालठाणे, रितेश मद्दी आणि शंकर खेडकर यांचा सहभाग होता.

Related News

पोलिसांच्या कडक पावलामुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली असून, परिसरातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

read also:  https://ajinkyabharat.com/salil-ankolas-story-of-cricket-debut-retirement-at-the-age-of-28/

Related News