खुद्द आमदार रवी राणांच्या हस्ते झाली सुरुवात
बडनेरा मतदार संघातील गोर गरीब जनतेची दिवाळी आनंदात
साजरी व्हावी म्हणून दरवर्षी दिवाळीपूर्वी किराणा वाटप करणाऱ्या
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
आमदार रवी राणा यांनी कालपासून किराणा, लाडक्या बहिणीला
साडी व प्लेट वाटप सुरु केले असून आचारसंहितेच्या भीतीमुळे
हे वाटप लवकर सुरु झाल्याची शहरात चर्चा आहे. संपूर्ण बडनेरा
मतदरसंघांतील शहरी व ग्रामीण भागातील एक लाख कुटुंबियांना
हे वाटप करण्यात येणार आहे.
गोर गरिबांच्या जीवनात गोडवा निर्माण करण्यासाठी, त्यांना राखी,
गणपती, नवरात्री व दिवाळी आनंदात साजरी करता यावी यासाठी
हे वाटप मोफत घरपोच मिळणार आहे. काल किराणा वाटप अभियानाचा
प्रारंभ करताना प्रत्येक कुटुंबाला किराणा मिळेपर्यंत हे अभियान
पुढील दीड महिना सातत्याने सुरू राहील, असे आमदार रवी राणा
यांनी शुभारंभाला जाहीर केले. राणा यांचा हा उपक्रम गेल्या १५ वर्षापासून
सुरू असून यातच त्यांच्या यशाचे गमक असल्याचे बोलले जाते.
या किराणा बॅग मध्ये साखर, तेल, चणाडाळ, पोहे, सोयाबीन वडी
शेंगदाणे, मुरमुरे, मसाला पाकीट, मिठपुडा आदी साहित्य असणार आहे.
सोबतच साडी व प्लेटची त्यात लाडक्या बहिणींमुळे भर पडली आहे.
या वर्षी या उपक्रमाची सुरुवात पार्वती नगर पासून करण्यात आली
आपण आपले सामाजिक दायित्व जोपासण्यासाठी आणि प्रत्येक कुटुंबियांसोबत
असलेले आपुलकीचे नाते कायमस्वरूपी जोपासण्यासाठी हा उपक्रम
गेल्या १५ वर्षापासून राबवित असून भविष्यातही हा उपक्रम असाच सुरू
ठेवण्याचा आपला संकल्प असल्याचे आमदार रवी राणा यांनी या कार्यक्रमात
जाहीर केले. सर्व स्वाभिमानी शिलेदार अत्यंत नम्रपणे कुणाचाही आत्मसन्मान
न दुखावता घरपोच किराणा वाटप करीत आहेत, जवळपास १ हजार स्वाभिमानी
शिलेदार सेवाभावी वृत्तीने ४ गोडावून मध्ये शेकडो टन किराणा साहित्याचे
पॅकिंग अहोरात्र करीत असून ५०० स्वाभिमानी पदाधिकारी व कार्यकर्ते
कुठलाही भेदभाव न करता प्रत्येक लाभार्थी कुटुंबियांना घरपोच किराणा किट
देण्याचे कार्य करीत आहेत, असेही राणा यांनी या कार्यक्रमात सांगितले.
Read also: https://ajinkyabharat.com/storyteller-pradeep-mishras-program-canceled-due-to-rain/