पुणे येथील पौड परिसरात कोसळले हेलिकॉप्टर

पुणे जिल्ह्यातील

पुणे जिल्ह्यातील पौड परिसरात एक हेलिकॉप्टर कोसळले आहे.

ही घटना आज दुपारी 3 वाजणेच्या सुमारास घडली. हेलिकॉप्टरमध्ये

पायलटसह एकूण चार लोक असल्याची प्राथमिक माहिती आहे.

Related News

खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडली असावी, असे सांगितले जात आहे.

हेलिकॉप्टर नेमके कोणत्या कंपनीचे आहे. त्यात किती आणि कोण व्यक्ती होत्या.

याबाबत कोणतीही माहिती अद्याप पुढे आली नाही. मात्र, ही घटना घडली तो भाग

अतिपर्जन्यवृष्टीचा परिसर म्हणून ओळखला जातो. आज पुणे जिल्ह्यातही मुसळधार

पाऊस पडत आहे. त्यामुळे या अपघातास पाऊस आणि खराब हवामान

कारणीभूत ठरले असावे, असा प्राथमिक तर्क काढला जातो आहे.

हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली असून,

प्रशासन घटनास्थळी दाखल होण्याची प्रतिक्षा आहे. काही स्थानिक नागरिकांनी

हेलिकॉप्टर कोसळताना प्रत्यक्ष पाहिले. हेलिकॉप्टर कोसळल्यामुळे मोठा आवाज झाला.

आवाजाच्या दिशेने स्थानिक नागरिक धावले असता त्यांना कोसळलेल्या

हेलिकॉप्टरचा सांगाडा पहायला मिळाला. दरम्यान, हेलिकॉप्टरमधून पायलट

बाहेर आल्याचे पाहिले. त्यांनी पालयट आणि पीडितांना मदत आणि बचावकार्य पुरवले.

दरम्यान, हेलिकॉप्टरमधून बाहेर आल्यानंतर पायलट बोलण्याच्या मनस्थितीत नाही.

तो प्रचंड घाबरला असून, कोणही नागरिकांनी हेलिकॉप्टरजवळ जाऊ नये,

असे सांगत असल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने खासगी वृत्तवाहीनीशी बोलताना सांगितले.

दरम्यान, एका खासगी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, स्थानिक प्रशासन

घटनास्थळी दाखल झाले आहे. थोड्याच वेळात हेलिकॉप्टर कोणत्या कंपनीचे होते,

ते कोणत्या कारणास्तव या प्रदेशात भ्रमंती करत होते याबाबत माहिती मिळू शकली नाही.

Read also: https://ajinkyabharat.com/heavy-rain-in-sindhudurg-river-nalyanna-pur/

Related News