महाविकास आघाडीची तीन दिवस मॅरेथॉन बैठक

मुंबईत

मुंबईत मोठ्या राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. महाविकास

आघाडीची मुंबईत तीन दिवस बैठक चालणार आहे. त्यानिमित्ताने

महाविकास आघाडीचे सर्वच नेते मुंबईत तळ ठोकून राहणार आहे.

Related News

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपासाठी महाविकास

आघाडीची बैठक होत असून या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

गेल्या काही दिवसात काही आमदार आणि काही पक्षांचे नेते हे माजी

केंद्रीय मंत्री शरद पवार यांना भेटून गेले. त्यामुळे या नेत्यांना महाविकास

आघाडीत घ्यायचे की नाही? यावरही बैठकीत चर्चा होणार असल्याचं

सांगितलं जात आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या बैठकीचे हे

तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.

महाविकास आघाडीची येत्या 27, 28 आणि 29 ऑगस्ट रोजी मुंबईत

बैठक होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीला शरद पवार,

उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्यासह तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित

राहणार आहेत. या बैठकीत जागा वाटपाचा निर्णय घेतला जाणार आहे.

या बैठकीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवला जाणार आहे. विद्यमान

आमदारांची संख्या वगळून इतर जागांबाबत या बैठकीत चर्चा होणार

असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या बैठकीत कुणाला किती

जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/prohibition-movement-supriya-sules-government-agapakhad/

Related News