बदलापूरच्या आदर्श विद्या मंदिर मध्ये दोन चिमुरडींवर झालेल्या
लैंगिक अत्याचार प्रकरणा विरूद्ध महाविकास आघाडीने 24 ऑगस्टला
बंद पुकारला आहे. आज उद्धव ठाकरे यांनी ‘ संवेदनशील मन असलेल्या
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
सार्यांनी 24 ऑगस्ट च्या ‘महाराष्ट्र बंद’ मध्ये सहभागी व्हावं’ असं आवाहन
केले आहे. कोरोना संकट काळाप्रमाणे आता ही आपल्या घरातील मुलगी,
आई, बहीण या प्रत्येक स्त्रीच्या सुरक्षिततेसाठी आणि सरकार ला अशा
घटनांमधील गांभीर्य समजवण्यासाठी सार्यांनी एकत्र येण्याचं आवाहन केले आहे.
जात-धर्म, पक्षामधील भेदाभेद बाजूला सारून सार्यांनी महाराष्ट्र बंद पाळावा
असं आवाहन ठाकरेंनी केलं आहे.
बदलापूरच्या घटनेनंतर अजून मुख्यमंत्री, गृहमंत्री तेथे फिरकले नाहीत.
सध्या राज्यात विविध ठिकाणी त्यांचे रक्षा बंधनाचे आणि ‘लाडकी बहीण’
चे कार्यक्रम सुरू आहेत. राख्या बांधून घेतल्या जात आहेत पण रक्षा करणं
हा त्यामागील मूळ उद्देश ते विसरले आहेत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी
सरकार वर टीका केली आहे. सरकारने शक्ती कायद्यामध्ये बदल करून
लवकरात लवकर शक्ती कायदा अंमलात आणावा असंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान ठाण्याचे पोलिस आयुक्त काय करत आहेत?
असा सवालही त्यांनी विचारला आहे.
मुलगी शाळेतही सुरक्षित नसे तर ‘मुलगी शिकली प्रगती झाली’ याला काय अर्थ?
असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. बदलापूर प्रमाणे राज्यातील इतर
भागातही अत्याचारांच्या वाढत्या घटना मन सुन्न करणार्या आहेत.
महाराष्ट्र बंद च्या स्वरूपाबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी लोकांनी उत्स्फुर्तपणे
त्यामध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन केले आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/virtuous-students-movement-yash-postponed-25th-august-exam/