महाराष्ट्रानं गेल्या दोन वर्षांत अनेक राजकीय भूकंप अनुभवले. शिवसेनेतील
अंतर्गत बंडाळीमुळे राज्याच्या राजकारणाला नवं वळण मिळालं.
न भूतो न भविष्यती, अनेक अविश्वसनिय घडामोडी घडल्या आणि हा लढा थेट कोर्टात पोहोचला.
Related News
15 वर्षांनंतर सर्वात लवकर आगमन
‘महाबीज’तर्फे बीटी कापूस व तूर बियाण्याच्या नव्या वाणांचे लोकार्पण;
अकोल्यात शिवसेना ठाकरे गटाकडून जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात तोडफोड…
धगधगत्या ट्रकनं हादरला महामार्ग, उसळला हाहाकार!
NCP Ajit Pawar गटाच्या अध्यक्षावर महिला छळप्रकरणी गुन्हा
रोहित शर्माच्या जागी साई सुदर्शनची एंट्री? इंग्लंड दौऱ्यासाठी संभाव्य युवा ओपनर
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
आता या प्रकरणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे.
या प्रकरणाच्या सुनावणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून मुहूर्त सापडत नाही आहे.
20 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावरील सुनावणी पार पडणार होती.
पण, आता ही सुनावणी तब्बल महिनाभर पुढे ढकलली आहे.
त्यामुळे आता या प्रकरणाचा सुनावणीसाठी तब्बल महिनाभरानंतरच सर्वोच्च न्यायालयाच्या
कामकाजात समावेश होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे.
निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानं ठाकरे गटाच्या
वतीनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल तसेच आमदार अपात्रतेचा निकाल हा राज्याच्या
राजकारणाला मोठी कलाटणी देणारा आहे. परंतु मागच्या अनेक महिन्यांपासून
शिवसेनेच्या सत्तासंघर्षाची सुनावणी झालेली नाही. त्यामुळ या प्रकरणाचा निकाल
थेट विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लागण्याची शक्यता आहे.