अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात घडलेल्या एका प्रेरणादायी घटनेत, बेशुद्ध पडलेल्या विद्यार्थिनीने रुग्णालयाच्या खाटेवरूनच बारावीचा गणिताचा पेपर सोडवला. प्रशासनाच्या तत्परता आणि संवेदनशीलतेमुळे तिचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्यापासून वाचले.
हिरापूर येथील अनंतराव देशमुख ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी श्रेया गुणवंतराव देशमुख ही २१ फेब्रुवारी रोजी परीक्षा केंद्रावर गणिताचा पेपर देण्यासाठी उपस्थित होती. मात्र सकाळी सुमारे १०:५० वाजता तिची प्रकृती अचानक बिघडली आणि ती चक्कर येऊन बेशुद्ध पडली. केंद्रावरील कर्मचारी आणि तिच्या पालकांनी तातडीने तिला मूर्तिजापूर येथील महाजन रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात उपचार सुरू असतानाच प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यावर श्रेयाने पेपर देण्याची इच्छा व्यक्त केली. ही माहिती मिळताच विभागीय अध्यक्ष संदीप सांगवे यांनी तत्काळ दूरध्वनीद्वारे मार्गदर्शन करत विशेष परवानगी दिली. त्यानुसार परीक्षा केंद्र क्रमांक २०१, श्री गाडगे महाराज विद्यालय येथून प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका पोलिसांच्या बंदोबस्तात सकाळी ११:५० वाजता रुग्णालयात पोहोचवण्यात आली.
Related News
अवैध सावकारीच्या तावडीतून शेतकऱ्याची 2 हेक्टर 2 आर जमीन मुक्त; जिल्हा निबंधकांचा आदेश
हुतात्म्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे; अमित आझाद यांचे प्रतिपादन
शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीर; ओला दुष्काळासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार – कृषिमंत्री भरणे
दुष्काळात काजू-बादामावर ताव; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर फडणवीस म्हणाले, “अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत”
DJ च्या दणदणाटाचा मंत्र्यालाच फटका! गुलाबराव पाटलांचा दावा; एका कानाने 40% ऐकू येईना
“तुम्ही आडवे या, मराठ्यांना एक जरी काठी लागली तर…” Manoj Jarange Patil चा सरकारला थेट इशारा!
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या ओएसडी आणि फोटोग्राफरचे विमान लंडनऐवजी थेट झ्युरिकला; तांत्रिक बिघाडाने उडाली खळबळ
Nepal मध्ये पुन्हा महासंकट! पुरानंतर काठमांडू हादरले; 5.0 तीव्रतेच्या भूकंपाने भीती
मुंबईत दहीहंडीला गालबोट! दुपारी 12 वाजेपर्यंत 22 गोविंदा जखमी
IMD Alert : महाराष्ट्रासह 17 राज्यांना वादळी पावसाचा महाअलर्ट! ताशी 60 किमी वेगाने वारे
मतदार यादीवरून राज्यात राजकीय रणकंदन; 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला!
Manoj Jarange Patil पुन्हा आक्रमक; भुजबळांवर बोचरी टीका, म्हणाले…
या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान गोपनीयतेचे सर्व नियम पाळण्यात आले. महिला पोलीस कर्मचारी सरला वारोदे यांची सुरक्षा व्यवस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली, तर पर्यवेक्षक म्हणून ढोकणे यांनी संपूर्ण वेळ देखरेख केली. तसेच पर्यवेक्षक वैशाली रामटेके आणि उपपर्यवेक्षक मोहम्मद इब्राहिम अली यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली विद्यार्थिनीला पेपर लिहिण्यास मदत केली.
प्रशासनाच्या या माणुसकीपूर्ण आणि संवेदनशील भूमिकेमुळे श्रेयाने नियोजित वेळेत आपला पेपर पूर्ण केला. या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीचे कौतुक होत असून, एका विद्यार्थिनीचे शैक्षणिक नुकसान टळले आहे.
