तालुक्यातील बेलखेड शिवारात अल्पभूधारक शेतकरी अशोक पुंडलिक धुमाळे यांच्या ऊसाच्या शेतात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. सर्वे क्रमांक ७९१ मधील या घटनेमुळे ऊसाचे मोठे क्षेत्र जळून खाक झाले असून सिंचनासाठी वापरली जाणारी बोरची केबल, स्प्रिंकलर पाईप व इतर साहित्य पूर्णतः नष्ट झाले आहे. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतातील वीजपुरवठा लाईनमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने ठिणग्या उडाल्या आणि कोरड्या उसाला आग लागली. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले. शेजारील शेतकऱ्यांनी धूर व ज्वाळा दिसताच तात्काळ धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली; मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात ऊस जळून गेला होता.
शेतकरी अशोक धुमाळे यांनी सांगितले की, “या आगीत माझ्या अनेक महिन्यांच्या परिश्रमावर पाणी फिरले. ऊसासोबतच स्प्रिंकलर पाईप, केबल आणि इतर सिंचन साहित्य जळाले आहे. मोठा आर्थिक फटका बसला असून शासनाने तातडीने मदत द्यावी.” त्यांनी पंचनामा करून योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
Related News
AI चा वापर करा, शेतीचा उत्पादन खर्च 25 ते 30 टक्क्यांनी कमी होईल; मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांना सल्ला
दहाव्या मजल्यावरून उडी घेतली अन् झाडाला अडकली; 4 महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या महिलेचा जीव थोडक्यात वाचला
कोलकात्यात हॉटेलला मध्यरात्री भीषण आग; झोपेतच 9 जणांचा मृत्यू, अनेकजण गंभीर
भिवंडीत मध्यरात्री काळाचा घाला! चार मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली, 9 जणांचा मृत्यू
मुंबई हादरली! कोस्टल रोड टनेलमध्ये कारला आग, 500 हून अधिक गाड्या अडकल्या
पुण्यात 15 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती; मोशीतील इमारत कोसळल्याने खळबळ, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
पिंपरी-चिंचवडमध्ये इमारत कोसळली; 15 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावासाठी 3 पथके तैनात
अकोल्यात बोगस बियाण्यांचा कहर; 5 हजारांहून अधिक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट?
पुण्यात भीषण दुर्घटना: पिंपरी-चिंचवडमध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची इमारत कोसळली, 14 जण अडकल्याची धक्कादायक भीती | 5 मोठे अपडेट्स
4 मोठ्या मागण्या: बोगस बियाण्यांवर आमदार हरीशभाऊ पिंपळे यांचा आक्रमक हल्ला; शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाईची जोरदार मागणी
कैलास लस्सी दुकानातून 7 कर्मचाऱ्यांची थरारक सुटका; स्टेशनलगतच्या घटनेने खळबळ
मानखुर्दमध्ये भीषण दुर्घटना! 3 मजली घर कोसळून 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
घटनेची पाहणी करून प्रशांत डिक्कर यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामा करण्याची मागणी केली. “अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अशी आपत्ती मोठा धक्का असतो. प्रशासनाने संवेदनशीलता दाखवून त्वरित मदत जाहीर करावी, जेणेकरून पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना आधार मिळेल,” असे त्यांनी सांगितले.
स्थानिक शेतकऱ्यांनीही विद्युत विभागाच्या दुर्लक्षामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप केला आहे. शेतातील वीजवाहिन्यांची नियमित तपासणी व देखभाल करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या घटनेमुळे बेलखेड परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाने लवकरात लवकर मदत जाहीर करावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
