बारामतीच्या खासदार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या
कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या व्हॉट्सअॅप हॅक प्रकरणामध्ये
पुणे पोलिसांनी एका अज्ञात व्यक्ती विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Related News
चालत्या ट्रेनमध्ये एटीएमची सुविधा! ‘फास्ट कॅश एक्सप्रेस’द्वारे प्रवाशांना नवे बँकिंग स्वातंत्र्य
मुंबई-अमरावती विमानसेवा सुरू; विदर्भवासीयांसाठी वेगवान प्रवासाचा नवा पर्याय
अकोला शहरात आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा
नाशिकमध्ये सातपीर दर्गा हटविण्यावरून हिंसाचार;
अकोटफैल परिसरात लुटमार करणाऱ्या ‘शेट्टी टोळी’चा पर्दाफाश; चार सराईत आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
मेळघाटात पर्यटकांसमोर दीड तास ‘लेडी ऑफ लेक’चा रुबाब; निसर्गप्रेमींच्या आनंदाला पारावर नाही
“राज्यातील सरकार ही लुटारू रचना” – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
भारतमाला एक्सप्रेस हायवेवर ज्वलनशील केमिकलने भरलेला टँकर उलटला;
सीकर कृषी मंडीत भीषण आग;
हनुमान जयंतीनिमित्त भव्य धार्मिक आयोजन – भक्तांनी घेतला आनंद
पातूर येथे उत्साहात गुरु-शिष्य जयंती साजरी
दिल्ली विमानतळावर तात्पुरता बदल: T2 टर्मिनल बंद,
रविवारी सुप्रिया सुळे यांनी X वर पोस्ट करत आपला फोन आणि व्हॉट्सअॅप
हॅक झाल्याचं सांगितलं होतं. त्यांना कॉल अथवा मेसेज न करण्याचंही आवाहन करण्यात आलं होतं.
दरम्यान सोमवार 12 ऑगस्ट दिवशी त्यांनी आपल्याला ब्लॅकमेल करून
आपल्याकडून USD 400 ची मागणी करण्यात येत असल्याचा दावा केला होता.
त्यांच्या टीम कडे मेसेज करून ही मागणी केल्याचा दावा सुप्रिया सुळेंनी केला आहे.
टीमने पैसे देण्याचे मान्य करून हॅकर्सना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला असता
हॅकर्सनी पैसे हस्तांतरित करण्यासाठी बँक खात्याचे तपशील देखील शेअर केल्याचं त्या म्हणाल्या आहेत.
याबाबत पोलिस स्टेशन मधील अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार,
एका अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून
Information Technology Act अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
सध्या या प्रकरणामध्ये पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
सुप्रिया सुळे यांच्याप्रमाणेच त्यांच्या सोबत असणार्या पक्ष कार्यकर्त्या आदिती नलावडे
यांचा देखील फोन हॅक झाला आहे. या फोन हॅक प्रकरणी तिच्याकडेही
10 हजारांची मागणी केली आहे. आयकर विभाग, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय),
आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांसारख्या एजन्सी सरकारच्या ताब्यात आहेत.
त्यांना राजकीय विरोधकांचे फोन हॅक करण्यासाठी ॲप्लिकेशनची आवश्यकता नाही.
पाळत ठेवण्याचे काही प्रकार असू शकतात असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
Read also: https://ajinkyabharat.com/work-band-movement-of-resident-doctors-to-stop-the-kolkata-incident/