विद्यापीठातील 39 विद्यार्थी ताब्यात
दिल्लीला लागून असलेल्या नोएडा येथील एका निवासी सोसायटीतील फ्लॅटवर
पोलिसांनी छापा टाकून 39 तरुण-तरुणींना ताब्यात घेतले आहे.
Related News
शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य! इंझोरी केंद्रातील मुख्याध्यापक
चर्चगेट स्थानकाबाहेर बेस्ट बसला आग;
गुलजारपुरा स्मशानभूमी मोजते अखेरच्या घटका
भारताला जपानकडून बुलेट ट्रेनची भेट! मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे
अकोल्यात केंद्र सरकारविरोधात काँग्रेसचे तीव्र आंदोलन!
मेरठमध्ये धक्कादायक प्रकार : तरुणाची २५ वर्षांनी मोठ्या विधवा महिलेशी फसवून लग्न
राजस्थानमध्ये भीषण अपघात; वरात घेऊन जाणारी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक….
अकोल्यात पाणी प्रश्न पेटला; शिवसेनेचा जलप्रदाय विभागात घागर मोर्चा, तोडफोड
कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान आयोजकांना पाच हजारांचा दंड
राजकोटमध्ये अपघात; ४ जणांचा मृत्यू, संतप्त नागरिकांचा रस्तारोको
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
सुदैवाने जीवितहानी टळली….
याठिकाणी रात्री फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी सुरू होती. पोलिसांच्या धाडीत पकडलेले
सर्वजण नामांकित विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून
मोठ्या प्रमाणात हरियाणा लेबलच्या दारूच्या बाटल्या आणि हुक्का जप्त केला आहे.
नोएडामधील सेक्टर 126 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेक्टर 94 मध्ये असलेल्या
सुपरनोव्हा बिल्डिंगच्या 19व्या मजल्यावर मुले-मुली पार्टी करत होते.
वरून कुणीतरी दारुची बाटली फेकली. त्यामुळे येथील लोकांनी या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली.
नोएडा पोलीसांनी घटनास्थळावरून पार्टी करणाऱ्या मुला-मुलींना ताब्यात घेतले आहे.
पोलिस या प्रकरणाचा रेव्ह पार्टीच्या दृष्टीकोणातूनही तपास करत आहेत.
एडीसीपी मनीष कुमार मिश्रा यांनी सांगितले की, सेक्टर 126 पोलिस स्टेशनला
सुपरनोव्हा इमारतीत मुले-मुली पार्टी करत असल्याची तक्रार मिळाली होती.
घटनास्थळी अंमली पदार्थ, दारूच्या बाटल्या आदी जप्त करण्यात आले आहे.
सुपरनोव्हा सोसायटीच्या फ्लॅटमध्ये पार्टी करताना पकडलेल्या विद्यार्थ्यांचे
वय 16 ते 20 वर्षांच्या दरम्यान आहे. नोएडा पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की,
व्हॉट्सॲपवर विद्यार्थ्यांना पार्टी करण्यासाठी मेसेज पाठवण्यात आला होता.
त्याद्वारे पार्टीची माहिती दिली जात होती. ताब्यात घेतलेल्या तरुण-तरुणींकडे
चौकशी केली असता, विद्यार्थ्यांना व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून पार्टीसाठी
बोलावण्यात आल्याचे समोर आले आहे. पार्टीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी
500 रुपये आणि जोडप्यासाठी 800 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले.
विद्यार्थ्यांना पाठवलेला संदेशही पोलिसांना मिळाला आहे.
याप्रकरणी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/supreme-court-scolds-state-government-regarding-rte-admission/