पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच निधन झालं आहे.
कोलकाता येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ते 80 वर्षांचे होते. कोलकातामधील पाम एव्हेन्यू येथील निवासस्थानी
Related News
धगधगत्या ट्रकनं हादरला महामार्ग, उसळला हाहाकार!
NCP Ajit Pawar गटाच्या अध्यक्षावर महिला छळप्रकरणी गुन्हा
रोहित शर्माच्या जागी साई सुदर्शनची एंट्री? इंग्लंड दौऱ्यासाठी संभाव्य युवा ओपनर
‘मोनिका ओ माय डार्लिंग’… ८६ व्या वर्षीही हेलेन यांचा जलवा कायम;
‘१२वी नापास, पण मोठमोठ्या वेबसाईट्स हॅक करणारे’
नवीन बस स्थानक टी पॉइंटवर अपघाताचा थरार;
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा;
अकोल्यात झिरो शॅडो डेचा अनुभव; नागरिक म्हणाले – सावलीच नाहीशी झाली!
२४ मे २०२५ चं हवामान : वीकेंडला मुसळधार पावसाचा इशारा,
ऑपरेशन सिंदूरवरून प्रेरित ‘स्पेशल बनारसी साडी’;
पटना-गया आणि बक्सर दरम्यान लवकरच धावेल ‘नमो भारत एक्सप्रेस’;
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 80 वर्षीय भट्टाचार्य गेल्या काही वर्षांपासून
गंभीर आजाराने त्रस्त होते. आज सकाळी 8.20 मिनिटांनी निधन झाले.
ते दीर्घकाळापासून सीओपीडी आणि वृद्धापकाळाशी संबंधित इतर आजारांनी त्रस्त होते.
त्याच्यावर कोलकाता येथील घरी उपचार सुरू होते.
भट्टाचार्य यांच्या पश्चात त्यांची पत्नी मीरा आणि मुलगी सुचेतना असा परिवार आहे.
ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ज्योती बसू हे आरोग्याच्या कारणास्तव
2000 साली मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य
यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली होती. मुख्यमंत्री असताना
भट्टाचार्य यांनी डाव्या पक्षांची आघाडी करून 2001 आणि 2006 च्या
निवडणुकीत विजय मिळविला होता. भट्टाचार्य प्रकृती अस्वास्थ्यामुळे
गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक जीवनापासून दूर होते.
त्यांनी 2015 मध्ये सीपीआय(एम) च्या पॉलिटब्युरो आणि केंद्रीय समितीचा
राजीनामा दिला होता. भट्टाचार्य 2000 ते 2011 पर्यंत पश्चिम बंगालचे
मुख्यमंत्री होते. ते भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) च्या पॉलिटब्युरोचे सदस्यही होते.
बुद्धदेव भट्टाचार्य यांचा जन्म 1 मार्च 1944 रोजी उत्तर कोलकाता येथे झाला.
नंतर त्यांनी माकपमध्ये प्रवेश केला. कम्युनिस्ट पक्षांच्या डाव्या विचारसरणीतील
परिवर्तनकारी नेते म्हणून भट्टाचार्य यांच्याकडे पाहिले जात होते.
त्यांनी पश्चिम बंगालमध्ये कारखानदारी सुरू केली.
सिंगूर येथे टाटा नॅनो प्रकल्प उभारण्यात त्यांनी पुढाकार घेतला.