नाशिक महापालिकेत राजकीय समीकरणे बदलली; मनसेची मोठी खेळी, शिंदे गटाला पाठिंबा
नाशिक महानगरपालिकेत (NMC) राजकीय घडामोडींना वेग आला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मोठी खेळी करत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची (Shiv Sena UBT) साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवार यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नाशिक महापालिकेत मनसेची मयुरी पवार या एकमेव नगरसेविका आहेत. याउलट शिवसेना शिंदे गटाचे 26 नगरसेवक विजयी झाले आहेत. मनसेचा पाठिंबा मिळाल्याने स्थायी समितीत शिवसेना शिंदे गटाचे संख्याबळ वाढणार असून, प्रभाग समित्या, स्वीकृत नगरसेवक आणि पालिकेतील विविध समित्यांवरील राजकीय समीकरणांमध्ये बदल होणार आहेत. विशेष म्हणजे, मनसेने याआधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह निवडणूक लढवली होती.
या निर्णयाबाबत मयुरी पवार यांचे पती आणि मनसेचे नेते अंकुश पवार यांनी माहिती दिली. “नाशिकमध्ये आगामी काळात कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्याचे आयोजन आमच्याच प्रभागात होत असल्याने मोठ्या प्रमाणावर विकासकामे होणे आवश्यक आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टीने आणि कुंभमेळ्याच्या तयारीसाठी आम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला,” असे त्यांनी स्पष्ट केले.
Related News
ज्ञानेश कुमारांमुळेच शिंदे-अजितदादा निवडणूक जिंकले; संजय राऊतांचा गंभीर आरोप, महाराष्ट्रातील निवडणूक रद्द करण्याची मागणी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरून देश...
Continue reading
ज्ञानेश कुमार यांचा ‘खापर पणजोबा’ कुठून आला? फॉर्म-६च्या वादावर संजय राऊत आक्रमक; महाभियोग आणण्याची घोषणा निवडणूक आयोगातील कथित अंतर्गत मतभेद आणि मतदार यादीच्या व...
Continue reading
Rohit Pawar चा मुख्यमंत्र्यांवर निशाणा; ‘भाकरी पिकवणारा शेतकरी आता शेतात बॉम्बही पिकवायला लागला का?’
दुष्काळी पाहणी दौऱ्यातील सुरक्षा व्यवस्थेवरून Rohit Pawarची टीका; शेतकऱ्यांना ...
Continue reading
Raj Thackeray निवडणूक आयोगावर आक्रमक; ‘१४ आक्षेपांनंतरही निर्णय झाले, मग कर्ताकरविता कोण?’
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभारावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray...
Continue reading
विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ ऑक्टोबरला निकाल
तीन पदवीधर, दोन शिक्षक मतदारसंघांचा समावेश; उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर
मह...
Continue reading
Manoj Jarange Patil यांच्या सहकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून छाननी; 764.7 कोटींच्या सरकारी कामांवरील आरोपांचीही तपासणीमराठा आरक्षणाच...
Continue reading
मोठी बातमी! महाराष्ट्रातील ५ शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीची घोषणा; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ ऑक्टोबरला मतमोजणी
महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्य...
Continue reading
कर्नाटकात जे होऊ शकतं, ते महाराष्ट्रात का नाही? शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
धाराशिवच्या कळंब तालुक्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी; हेक्टरी ५० हजार ...
Continue reading
७ दिवसांत माफी मागा, अन्यथा ५०० कोटींचा दावा! मातोश्रीबाहेरच स्वीकारली नोटीस; Satish Salian–आदित्य ठाकरे वाद चिघळला
Disha Salian मृत्यू प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकार...
Continue reading
अजितदादांच्या आठवणीने सुनेत्रा पवार भावूक; भरसभेत डोळ्यात अश्रू, म्हणाल्या- ‘३२ वर्षे ५ महिन्यांचं अतूट नातं’
पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १०९व्या वार्षिक सर्वसाधा...
Continue reading
UPI शुल्कावर राज ठाकरे आक्रमक; “डिजिटल सापळा” म्हणत केंद्र सरकारवर निशाणा
UPI व्यवहारांवरील शुल्काच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...
Continue reading
रेजीनगर पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट; Mamata Banerjee च्या उमेदवाराचा माघारीचा निर्णय बदलला, नंदीग्रामनंतर पुन्हा राजकीय नाट्य
Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या राजकारणात विधानसभा पो...
Continue reading
दरम्यान, नाशिक महापालिकेत अखेर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने सत्ता स्थापन केली आहे. भाजपच्या हिमगौरी आडके यांची महापौरपदी, तर शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असतानाही वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर भाजप–शिवसेना शिंदे गट युतीचा निर्णय घेण्यात आला. या सत्तास्थापनेमुळे नाशिकच्या राजकारणात नवे समीकरण उभे राहिले असून, आगामी काळात विकासकामांवर त्याचा परिणाम दिसून येणार आहे.
read also : https://ajinkyabharat.com/big-revelation-ajit-pawar-plane-crash-7-serious-doubts-shinde-gattachis-reaction-discussed/