अकोला : जिल्हा पोलीस दलाकडून राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार’ मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत कत्तलीच्या उद्देशाने ठेवण्यात आलेल्या २५ गोवंश जातीच्या जनावरांची सुटका केली आहे. या कारवाईत अंदाजे ₹६ लाख १५ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ‘ऑपरेशन प्रहार’ प्रभावीपणे राबवले जात आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या खात्रीलायक गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक API विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक विष्णू बोडखे, पो.उपनि. माजिद खान पठाण व इतर पोलीस कर्मचारी खाजगी वाहनाने शहरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोळा चौक परिसरात गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, दहीहांडा वेस, खिडकी पुरा येथील शेख सद्दाम शेख मेहबुब आणि मोबिन कुरेशी मोहसीन कुरेशी यांनी खिडकी पुरा मशिदीसमोरील त्यांच्या ताब्यातील मोकळ्या जागेत गोवंश जातीची जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवली आहेत.
Related News
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वाशिममध्ये मुख्यमंत्र्यांची कर्जमाफीबाबत मोठी घोषणा
ज्ञानेश कुमारांमुळेच शिंदे-अजितदादा जिंकले; संजय राऊतांचा गंभीर आरोप
सणासुदीत मोठी खुशखबर! खाद्यतेलावरील आयात शुल्कात केंद्राची मोठी कपात
शेतात मेटल डिटेक्टर लावल्यावरून Rohit Pawar आक्रमक; मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा
निवडणूक आयोगातील ‘14 आक्षेप’ समोर येताच Raj Thackeray आक्रमक; म्हणाले, ‘कर्ताकरविता कोण?’
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! तीन दिवसांत दुष्काळाची अधिसूचना; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
MPSC विद्यार्थ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; जुन्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नबाबत म्हणाले…
Manoj Jarange Patil यांच्या सहकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी; आयकर विभागाच्या रडारवर कोण?
पुण्यात 150 गणेश मंडळांना लक्ष्मी रस्त्यावर मिरवणुकीची परवानगी नाकारली; रवींद्र धंगेकर आक्रमक
Weather Update : देशावर पुन्हा पावसाचं संकट; महाराष्ट्रासाठीही IMDचा मोठा इशारा
हुतात्म्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे; अमित आझाद यांचे प्रतिपादन
शेवगा फाट्यावर तामगाव पोलिसांची मोठी कारवाई; चिल्ड्रन बँकेच्या नोटांनी फसवणूक करणारे 4 आरोपी अटकेत
मिळालेली माहिती तात्काळ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा शंकर शेळके यांना कळविण्यात आली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्र.सहाय्यक पोलीस अधीक्षक ईशानी आनंद मॅडम यांच्या उपस्थितीत दोन पंचांना सोबत घेऊन पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. दुपारी सुमारे ३ वाजता नमूद ठिकाणी छापा टाकण्यात आला.
छाप्यात एकूण २५ गोवंश जातीची जनावरे अत्यंत दयनीय अवस्थेत आढळून आली. काही जनावरे जखमी व अशक्त होती, तर त्यांना पाणी आणि चाऱ्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. प्राथमिक तपासात ही जनावरे कत्तलीसाठीच ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. या सर्व जनावरांची एकूण अंदाजे किंमत ₹६,१५,००० इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
छाप्यादरम्यान आरोपींचा शोध घेण्यात आला; मात्र ते त्यांच्या राहत्या घरी किंवा परिसरात आढळून आले नाहीत. तसेच या जनावरांबाबत कोणतीही वैध कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी पंचनामा करून सर्व २५ गोवंश जातीची जनावरे जप्त केली.
जप्त करण्यात आलेल्या जनावरांची देखभाल, सुरक्षा आणि वैद्यकीय उपचार व्हावेत यासाठी त्यांना अटी-शर्तीवर आदर्श गोसेवा केंद्र, ग्राम म्हैसपूर, अकोला येथे सुपूर्द करण्यात आले आहे. सध्या या जनावरांवर आवश्यक उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणी फरार आरोपी शेख सद्दाम शेख मेहबुब आणि मोबिन कुरेशी मोहसीन कुरेशी (दोन्ही रा. दहीहांडा वेस, खिडकी पुरा, अकोला) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९९५ मधील कलम ५, ५(क), ९, ९(अ), प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंध कायदा १९६० मधील कलम ११(ड) तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३२९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत असून आरोपींना लवकरच अटक होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी.चंद्रकांत रेड्डी, प्र.सहाय्यक पोलीस अधीक्षक ईशानी आनंद मॅडम आणि पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अकोला शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत API विजय चव्हाण, पो.उप.नि. विष्णू बोडखे, हेड कॉन्स्टेबल फिरोज खान, खुशाल नेमाडे, शेख हसन, अब्दुल माजिद, वसीमुद्दीन, किशोर सोनवणे, अमोल दिपके, स्वप्निल खेडकर, राज चंदेल, मोहम्मद अमीर, अभिषेक पाठक, आकाश मानकर आणि जीपीएसआय विनोद ठाकरे यांचा सहभाग होता.
‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत झालेल्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यात बेकायदेशीर कत्तल आणि प्राण्यांवरील अत्याचाराविरुद्ध पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे पशुप्रेमी नागरिकांकडून पोलिसांच्या कार्याचे स्वागत करण्यात येत असून अशा कारवाया पुढेही सुरू राहाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
