गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी जलसाठा
अकोला जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस सुरू असताना सुद्धा
तेल्हारा तालुक्यातील प्रसिद्ध वारी हनुमान येथील हनुमान सागर प्रकल्प
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने सद्यस्थितीत हनुमान सागर वान प्रकल्पात
२७.०४ टक्के जलसाठा असल्याची माहिती वान प्रकल्प शाखा अभियंता
नयन लोणारे यांनी आमचे प्रतिनिधी यांना दिली.
श्री. वारी हनुमान सागर प्रकल्पात आजचा उपयुक्त साठा २२.१६ दलघमी एवढा असून,
याची टक्केवारी २७.०४ टक्के एवढी आहे.
हिवरखेडपासून जवळच अकोला, अमरावती, बुलडाणा, या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर
वारी हनुमान येथे वान नदीवर “वान प्रकल्प” हे धरण आहे.
येथील जलाशयाला हनुमान सागर असे नाव दिले आहे.
या प्रकल्पातील शुद्ध पाण्याने अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील शेकडो गावे
आणि अनेक शहरातील लक्षावधी जनतेची तहान वर्षानुवर्षांपासून भागत आहे.
याच प्रकल्पातून ८४ खेडी पाणीपुरवठा योजना आहे.
एवढेच नव्हे तर या पाण्याच्या सिंचनातून हजारो शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
त्यामुळे वान प्रकल्पाला “वरदान प्रकल्प” म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
हनुमान सागरमधून निघालेल्या कालव्यां द्वारे परिसरातील हजारो एकर शेती ओलित केल्या जाते.
हनुमान सागरातून निघालेल्या कालव्याद्वारे शेतकरी गहू, चना भुई शेंग व उन्हाळी मूग
इतर बरेच पिके घेतात. परिसरात कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे
परिसरातील शेतकरी आनंदीत दिसत आहे. वारी हनुमान सागर अकोला, बुलडाणा
या दोन जिल्ह्यांसाठी वरदान आहे. तरी यावर्षी ऑगस्ट महिन्यातील पावसाने
पुन्हा श्री हनुमान सागर पूर्णतः भरेल व शेतकऱ्यांच्या आशा पूर्ण होतील,
या आशेवर शेतकरी दिसत आहे, अशी माहिती युधिष्ठिर भांगडिया
सहायक अभियंता वानप्रकल्प व्यवस्थापन उपविभाग तेल्हारा व शाखा अभियंता
नयन लोणारे यांनी दिली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/6-thousand-977-cases-decided-in-lok-adalat/