पीकेव्ही, महाबीजसह खाजगी नर्सरी मध्ये विविध झाडांची विक्री
पावसाळ्यामध्ये परसबागेत विविध फुलझाडे व शोभिवंत झाडे लावण्यासाठी
अनेक निसर्गप्रेमी नर्सरीमध्ये अशा झाडांची खरेदी करतात.
Related News
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
यावर्षी देखील परसबाग फुलविण्यासाठी शहरातील विविध नर्सरीमध्ये
महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे.
राज्यातील व राज्याबाहेरील विविध शोभिवंत फुलझाडांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
पावसाळ्यामध्ये अनेक महिला, पुरुष आपल्या घराच्या अंगणात
किंवा फ्लॅटच्या गॅलरीमध्ये किंवा टेरेसवर परसबाग फुलवतात.
या परसबागेमध्ये विविध प्रकारच्या गुलाबांसह मोगरा, जास्वंद, लिली यासह विविध फुलांचे वेल व झाडे लावतात.
याशिवाय मनी प्लांट व विविध प्रकारचे शोभिवंत झाडे सुद्धा परसबागेत लावली जातात.
घरात कुंडीमध्ये लावण्यासाठी सुद्धा काही शोभिवंत झाडे खरेदी केली जातात.
या सर्व प्रकारच्या फूलझाडे व शोभिवंत झाडांच्या खरेदीसाठी
महिलांची शहरातील विविध नर्सरीमध्ये सध्या मोठी गर्दी दिसत आहे.
५० रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारची झाडे विक्री होत आहेत.
शहरात महाबीज व कृषी विद्यापीठाच्या नर्सरी आहेत.
या ठिकाणी विविध प्रकारचे रोपे मिळतात. यासोबतच काही खाजगी नर्सरी आहेत.
ठिकाणी देखील विविध प्रकारचे झाडे विक्री होतात. या सर्व झाडांच्या रोपांसह
ही रोपे लावण्यासाठी प्लास्टिकच्या कुंड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.
राज्यातील फुलझाडे शोभिवंत झाडांसह परराज्यातून देखील अनेक प्रकारची
फुलझाडे व शोभिवंत झाडे अकोल्यात विक्रीसाठी येतात. त्यांनाही मोठी मागणी आहे.
सध्या शहरात सगळीकडे घरातील अंगण, फ्लॅट मधील गॅलरी
व टेरेस वरील परसबाग सजविण्याची धामधूम दिसून येत आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/balapur-taluka-declared-hail-drought/