सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार

गोरेगाव येथील घटना; अल्पवयीन मित्राविरुद्ध गुन्हा

आर.आर तिवारी| सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर

तिच्याच अल्पवयीन मित्राने लैगिंक अत्याचार केल्याची घटना

Related News

गोरेगाव परिसरात उघडकीस आली आहे.

याप्रकरणी सतरा वर्षांच्या मित्राविरुद्ध दिडोंशी पोलिसांनी

लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या पालकांच्या स्वाधीन

करण्यात आले आहे.

१६ वर्षांची पिडीत मुलगी आणि आरोपी मुलगा

एकाच परिसरातील रहिवाशी असून एकमेकांच्या परिचित आहेत.

या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते.

बुधवारी सकाळी दहा वाजता तो तिच्या घरी आला होता.

यावेळी तिच्या घरी कोणीही नसल्याचा फायदा घेऊन त्याने

तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता.

हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असे सांगून तो पळून गेला होता.

सायंकाळी पिडीत मुलीने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला.

त्यानंतर त्यांनी दिडोंशी पोलीस ठाण्यात

आरोपी अल्पवयीन मुलाविरुद्ध तक्रार केली होती.

या मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मित्राविरुद्ध ६४ (१), ६५

भारतीय न्याय सहिता सहकलम ४, ८, १२ पोक्सो कलमांतर्गत

गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच

त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्याने या गुन्ह्यांची कबुली दिली.

त्यानंतर त्याच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून

ही माहिती सांगून त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले होते.

Read also: https://ajinkyabharat.com/yandacha-lokmanya-tilak-national-award-announced-to-sudha-murthy/

Related News