लोकमान्य टिळक यांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीच्या अनुषंगाने
मानवी व सामाजिक विकासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या
ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
Related News
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (टिळक स्वराज्य संघ)
वतीने शनिवारी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी
शनिवारी पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली.
गुरूवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या
104 व्या पुण्यतिथीनिमित्त नवी दिल्ली येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
महाराष्ट्र सदनात सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या सोहळ्यात
सुधा मूर्ती यांना टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक
यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार,
खासदार डॉ. शाहू छत्रपती महाराज, केरळचे माजी गृहमंत्री रमेश चेन्निथला
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तसेच डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणति रोहित टिळक
यांच्यासह ट्रस्टचे अन्य विश्वस्त यावेळी उपस्थित असतील.
स्मृतिचिन्ह आणि एक लाख रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सुधा मूर्ती या मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेमधून लिखाण करतात.
कर्नाटक सरकारच्या सर्व शाळांत त्यांनी संगणक आणि ग्रंथालये उपलब्ध करून दिली आहेत.
त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात ‘मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया’ या नावाचे ग्रंथालय सुरू केले आहे.
कर्नाटकातील ग्रामीण भागांत आणि बंगळुरू शहर व परिसरात त्यांनी
सुमारे 10,000 स्वच्छतागृहे संस्थेच्या माध्यमातून उभारली.
तामिळनाडू आणि अंदमान येथे त्सुनामीच्या काळात त्यांनी विशेष सेवाकार्य केले.
महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील रहिवाशांनाही संस्थेने मदत दिलेली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/pm-modi-to-visit-ukraine-next-month/