अकोला :
मराठा पाटील समाजातील अंतर्मुख करणाऱ्या प्रश्नांवर मोकळा संवाद घडवून आणण्यासाठी, परंपरेच्या नावाखाली रुजलेल्या अनिष्ट रूढींना छेद देण्यासाठी आणि भावी पिढीसाठी विवेकी समाजघडणीचा ध्यास घेऊन मराठा पाटील संघ, बाळापुर तालुक्याच्या वतीने आज (दि. १७) ‘समाजसंवाद पदयात्रे’चा शुभारंभ होत आहे. दुपारी ३ वाजता काजीखेड येथून मान्यवरांच्या शुभेच्छा व आशीर्वादाने पदयात्रेला सुरुवात होणार आहे.
संस्थापक अध्यक्ष प्रा. राजदत्त मानकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली व संघटनेचे अध्यक्ष शरद वानखडे यांच्या नेतृत्वाखाली निघणारी ही पदयात्रा २६ जानेवारीपर्यंत काजीखेड ते वाडेगाव या मार्गावरून प्रवास करणार आहे. “सहभागी व्हा! सहभागी व्हा!” अशी समाजाला साद घालणारी ही पदयात्रा केवळ चालण्याची नव्हे, तर विचारांची व परिवर्तनाची ठरणार आहे.
पदयात्रेदरम्यान समाजातील लग्नसमारंभातील वाढता खर्च, वर–वधू संशोधनातील विलंब, कृषी शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी यांसारख्या ज्वलंत प्रश्नांवर प्रत्येक गावात सभा घेऊन मुक्त विचारमंथन होणार आहे. समाजाने स्वतःशी संवाद साधत प्रश्न ओळखावेत व उत्तरांची सामूहिक वाटचाल करावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.
Related News
मुंबईत दहीहंडीला गालबोट! दुपारी 12 वाजेपर्यंत 22 गोविंदा जखमी
IMD Alert : महाराष्ट्रासह 17 राज्यांना वादळी पावसाचा महाअलर्ट! ताशी 60 किमी वेगाने वारे
मतदार यादीवरून राज्यात राजकीय रणकंदन; 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला!
Manoj Jarange Patil पुन्हा आक्रमक; भुजबळांवर बोचरी टीका, म्हणाले…
Chief Minister Devendra Fadnavis ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात अकोल्यात; 1 हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण!
‘नशा मुक्त युवा, ड्रग फ्री इंडिया’; PM नरेंद्र मोदींचा तरुणांना मोठा संदेश
कुरणखेडच्या गजानन महाराज विद्यालयाचा कायापालट! माजी विद्यार्थ्यांकडून 10 हून अधिक भौतिक सुविधांचे लोकार्पण
मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर गायकवाड कुटुंबावर दु:खाचा डोंगर; पतीनंतर पत्नीनेही उचललं टोकाचं पाऊल
अकोला पासपोर्ट कार्यालयाचा ‘महत्त्वपूर्ण विस्तार’ होणार? खासदार अनुप धोत्रे यांची एस. जयशंकरांकडे ठोस मागणी; 1लाख नागरिकांना मोठा दिलासा
अकोल्यात विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; धमकीच्या फोननंतर घडली धक्कादायक घटना , 5 मिनिटांत संपलं आयुष्य!
अकोला शिक्षक बदली घोटाळा: 33 शिक्षक निलंबित, 65 जणांची वेतनवाढ रोखली | 136 दोषींवर मोठी कारवाई
या प्रवासात काजीखेड, जानोरी मोखा, वझेगाव, हिंगणा दगडखेड, नागद, सागद, बहादुरा, कारंजा, सोनाळा, बोरगाव वैराळे, शिंगोली, मोरझाडी, उरळ बु., मोरगाव, हसनापूर, अडोशी, सोनगिरी, वाडेगाव, मानकी, सांगवी, बाळापूर आदी गावांत मुक्काम व ग्रामसभा होणार आहेत. दररोज सकाळी ८.३० वाजता पदयात्रेला सुरुवात होऊन सायंकाळी ५ वाजता मुक्कामाच्या गावी पोहोचणार आहे.
हार, शाल, पुष्पगुच्छांसारख्या दिखाऊ सत्कारांना फाटा देऊन विचार, सहभाग व संवादाला प्राधान्य देण्याचे आवाहन अध्यक्ष शरद वानखडे यांनी केले आहे. वारकरी दिंडी ग्रामप्रदक्षिणेसाठी रथासमोर ठेवणे, गुणवंत विद्यार्थ्यांची यादी सादर करणे, महिला, युवक, युवती व बालकांचा सक्रिय सहभाग घडवून आणण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पदयात्रेदरम्यान समाजाची दिनदर्शिका विक्री, पुढील गावापर्यंत सहभागाची संधी, तसेच उपवर मुला–मुलींच्या ऑनलाईन बायोडाटाचे संकलन करून समाजोपयोगी उपक्रमांना चालना दिली जाणार आहे. ही पदयात्रा समाजाच्या आत्मपरीक्षणाचा व परिवर्तनाचा प्रवास ठरेल, असा विश्वास समाजातील जाणकार व्यक्तींनी व्यक्त केला आहे.
मराठा पाटील समाजातील प्रत्येक घटकाने या समाजसंवाद पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा योद्धा गजानन हरणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
