अकोला शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुलेनाट्यगृह येथे आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र ही सभा ऐनवेळी रद्द करण्यात आल्याची अधिकृत घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे. या निर्णयामुळे भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
भाजपकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि आसपासच्या महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपची महत्त्वाची कोर कमिटी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला प्राधान्य देण्यात आल्याने रवींद्र चव्हाण यांचा संपूर्ण नियोजित विदर्भ दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमित शहा यांचा हा दौरा रात्री उशिरा निश्चित झाल्यामुळे पक्षाने तातडीने कार्यक्रमात बदल केला.
अकोल्यातील प्रचार सभेसाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली होती. खुलेनाट्यगृह परिसरात बॅनर, फलक लावण्यात आले होते तसेच कार्यकर्त्यांची उपस्थितीही मोठ्या संख्येने अपेक्षित होती. मात्र वरिष्ठ पातळीवरील बैठकीला महत्त्व असल्याने सभा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे पक्षाने स्पष्ट केले आहे.
Related News
एपस्टीन फाइल्सवरून राऊतांचा खळबळजनक दावा; ‘अमेरिकेला प्रोटेक्शन मनी दिली जात आहे’
श्वेता महालेंचा संजय गायकवाडांना पुन्हा टोला; ‘बाप तो बाप रहेगा’वरून वाद पेटला
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीत संघर्ष; राष्ट्रवादीच्या मागणीने नवा ट्विस्ट
Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनामागे राजकीय शक्ती? आशिष शेलारांच्या दाव्याने खळबळ
17 खासदारांना भाजपचा मोठा झटका; पक्षप्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम, दिल्लीत खळबळ
Disha Salian प्रकरणात पुन्हा ट्विस्ट; ठाकरे कुटुंबाला डाग कोणी लावला? भाजप नेत्याचा राऊतांना पलटवार
मोदींच्या वाढदिवसापासून ‘सेवा संकल्प अभियान’; अमित शाहांची मोठी घोषणा, देशभर होणार 12 कार्यक्रम
महाराष्ट्र गीत सुरू असताना ठाकरे बंधू उभे राहिले नाहीत? VIDEO व्हायरल; भाजपचा जोरदार हल्लाबोल
गरब्यात मुस्लिमांना प्रवेश नको? संजय राऊत म्हणाले, “मी अमृता फडणवीस वहिनींसोबत!”
UP Election 2027: भाजपचा मास्टर प्लान तयार! तावडे-संतोष-नितीन नवीन मैदानात
Vinod Tawde चा मोठा डाव! उत्तर प्रदेशात 2027 च्या निवडणुकीसाठी ‘गेमचेंजर’ प्लॅन
संजय राऊतांवर तुरुंगात विषप्रयोग? म्हणाले- ‘टॉक्सिक टेस्ट करणार’
या संदर्भात भाजपचे प्रवक्ते गिरीश जोशी यांनी माहिती देताना सांगितले की, पक्षाच्या दृष्टीने ही कोर कमिटी बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. मुंबईसह इतर महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली असून त्यामुळे रवींद्र चव्हाण यांचा विदर्भ दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. लवकरच नव्या तारखा जाहीर करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“अमित शहा यांच्या उपस्थितीत होणारी कोर कमिटी बैठक पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांचा विदर्भ दौरा आणि अकोल्यातील सभा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. पुढील काळात नवीन कार्यक्रम जाहीर केला जाईल.”दरम्यान, सभा रद्द झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी दिसून आली असली तरी पक्षशिस्त आणि वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्णयाला प्राधान्य देत भाजप कार्यकर्त्यांनी संयम राखल्याचे चित्र आहे.
— गिरीश जोशी, भाजप प्रवक्ते
read also : https://ajinkyabharat.com/7-powerful-ways-to-boost-your-thyroid-health-important-tips-for-men-and-women/
