वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई
मनोरमा खेडकर यांना अखेर अटक करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांची चार पथके त्यांच्या शोधात होते.
Related News
सात महिने जुनी तक्रार दुर्लक्षित! मयुरीच्या आईने महिला आयोगाला लिहिलं होतं पत्र
“फायदा करून देणार 100 टक्के…”
EPFO चा 7 कोटी सदस्यांना गिफ्ट;
कान 2025 : आलिया भट्टच्या ड्रेसची मल्लिका शेरावतच्या गाऊनशी तुलना;
पुण्यातील बनावट कॉल सेंटरवर मोठी कारवाई;
“केंद्र आणि राज्यांनी टीम इंडियासारखे एकत्र काम केल्यास कोणतंही उद्दिष्ट कठीण नाही”
अकोट तालुक्यात परवानाधारक दुकानदारांना जून ते ऑगस्ट 2025 पर्यंतचे अन्नधान्य उपलब्ध;
किरीट सोमय्या हेच एक भोंगा – हर्षवर्धन सपकाळ….
हवामान खात्याकडून मान्सूनचा – डबल अटैक जारी !
21 वर्षीय तरुणाचा मृत्यू, पुन्हा एकदा सतर्कतेची गरज!
15 वर्षांनंतर सर्वात लवकर आगमन
‘महाबीज’तर्फे बीटी कापूस व तूर बियाण्याच्या नव्या वाणांचे लोकार्पण;
रायगड जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर महाडमधील हिरकणवाडी येथे सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली.
हिरकणवाडीच्या हॉटेल पार्वतीमधून त्यांना अटक केली गेली.
पुणे पौड पोलीस त्यांना घेऊन पुण्याकडे निघाले आहेत.
त्यांना गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना धमकवल्याच्या प्रकरणात मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल होता.
त्यानंतर त्या फरार झाल्या होत्या. पूजा खेडकर यांचेही प्रशिक्षण थांबवून
त्यांना मसूरी येथील लाल बहादुर शास्त्री नॅशनल एकेडमी ऑफ एडमिनिस्ट्रेशनमध्ये तातडीने परत बोलवले आहे.
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांचे संपूर्ण कुटुंबच वादात आले आहे.
पूजा खेडकर यांचे कारनामे उघड झाल्यानंतर त्यांच्या आई अन् वडिलांचे कारनामे समोर आले.
पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांनी मुळशीमधील
शेतकऱ्यांना धमकवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
या व्हिडीओनंतर मनोरमा खेडकर यांच्यावर पुण्यातील
पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर मनोरमा खेडकर फरार झाल्या होत्या.
त्यांच्या शोधासाठी पुणे पोलिसांची चार पथके रवाना झाली होती.
या प्रकरणात मनोरमा खेडकर यांच्यासह त्यांचे पती दिलीप खेडकर, अंबादास खेडकर,
दोन पुरुष बाउंसर, दोन महिला बाउन्सर आणि इतरांवर शेतकरी पंढरीनाथ कोंडीबा पासलकर
यांच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Read also: https://ajinkyabharat.com/haryana-governments-big-announcement-for-firefighters/