जयंत पाटलांचा पराभव; महायुतीची सरशी !

विधान

विधान परिषद निवडणूक : महायुतीने मविआची मते पळविली !

विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला

Related News

मोठा धक्का बसला आहे. तर महायुतीचे सर्व ९ उमेदवार जिंकून आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर उभे राहिलेले

शेकापचे जयंत पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला.

शरद पवार गटाचे १२ आमदार आहेत. या सर्व १२ आमदारांची मते

जयंत पाटील यांना पडली.

मात्र, त्याउपर इतर मतांची जुळवाजुळव त्यांना करता आली नाही.

त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

महाराष्ट्रातील सध्याच्या घडीला सर्वात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या

विधान परिषद निवडणुकीचा निकाल समोर आला आहे.

या निवडणुकीत भाजपच्या पाचही उमेदवारांचा विजय झाला आहे.

तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या

दोन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे.

या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीकडे खो दिला आहे.

महायुतीने महाविकास आघाडीची मते पळवली आहेत.

त्यामुळे मतांचा कोटा पूर्ण असताना देखील महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

या निवडणुकीत पक्षीय बलाबल पाहता विजयासाठी

२३ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता.

विधान परिषदेच्या ११  जागांसाठी ही निवडणूक पार पडली.

या निवडणुकीत महायुतीने १ उमेदवार जास्त दिल्याने चुरस वाढली होती.

महायुतीकडे असणारी मते पाहता त्यांची ८ उमेदवार सहज जिंकून येणार होते.

पण त्यांनी ९ वा उमेदवार दिल्याने या निवडणुकीतली लढत अटीतटीची ठरली.

या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तीनही घटक पक्षांनी

प्रत्येकी उमेदवार दिला होता,

महाविकास आघाडीच्या एकूण मतांचा विचार करता

त्यांचे तीनही उमेदवार सहज जिंकून येऊ शकले असते.

पण या निवडणुकीत महायुतीने मविआला धक्का दिला.

महायुतीने या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी दोन दिवसांपासून मोठी तयारी केली होती.

Read also: https://ajinkyabharat.com/june-25th-will-be-celebrated-as-constitution-murder-day-in-the-country/

Related News