अकोला | प्रतिनिधी – अकोट फाईल पोलिसांनी शासनाने प्रतिबंधित केलेल्या नायलॉन चायनीज मांजाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला अटक करून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. २८ डिसेंबर २०२५ रोजी अकोट फाईल येथील शंकर नगर परिसरात पोलीस निरीक्षक रहीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून अभय देवानंद भोसले (१९) या आरोपीच्या ताब्यातून ‘ब्लॉक फायटर’ लेबल असलेले काळ्या रंगाचे ३३ नग नायलॉन मांजा जप्त केले. प्रत्येकाची किंमत १ हजार २०० रुपये असून, एकूण ३९,६०० रुपये मूल्याचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
नायलॉन चायनीज मांजा नागरिकांसाठी, दुचाकी वाहनचालकांसाठी, पादचारी व पशुपक्ष्यांसाठी अत्यंत धोकादायक असून, त्याचा वापर गंभीर दुखापती आणि जीवितहानीस कारणीभूत ठरतो. शासनाने त्यामुळे यावर बंदी घालली आहे, तरीही आरोपीने आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीर विक्री सुरू ठेवली होती.
या प्रकरणी अकोट फाईल पोलीस स्टेशनमध्ये अप. क्र. ६१६/२५ अंतर्गत भारतीय दंडसंहिता कलम ११०, २२३ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियमाचे कलम ४, ५, १५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेतले गेले आहे. पुढील तपास पो. उपनि. अख्तर शेख करत आहेत.
Related News
पूर्णेकर हत्या प्रकरणाचा भडका! राजन विचारे संतप्त, पोलिसांना विचारले ५ थेट सवाल
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून ठाण्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकर...
Continue reading
गडचिरोलीत ‘फॉरेस्ट स्पेशल इकॉनॉमिक झोन’ उभारण्याची मागणी; खाणीऐवजी जंगलाधारित उद्योगांना प्राधान्य द्या
शेतकरी कामगार पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन; बांबू, तेंद...
Continue reading
कर्जत-भीमाशंकरमधील 32 हजार झाडांच्या कत्तलीवर मोठा विरोध! सूरज चव्हाणांचा सरकारला 1 जबरदस्त पर्याय
महाराष्ट्रातील कर्जत-भीमाशंकर परिसरात प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पासाठी होणाऱ्या...
Continue reading
राहुल नार्वेकरांविरोधात संजय राऊतांचा मोठा बॉम्ब! गुजरातच्या उद्योगपतींसाठी जमीन मिळवून दिल्याचा आरोप; साई डोंगरातील वृक्षतोडीवरही संताप
Sanjay Raut on Rahul Narwekar: शिवसेना (उद...
Continue reading
भिमाशंकर प्रकल्पावरून राजकीय वाद पेटला! लवासा-अँबी व्हॅलीचा दाखला देत मेघना बोर्डीकरांचा विरोधकांना थेट सवाल
आदित्य ठाकरे यांच्या टीकेनंतर मंत्री मेघना बोर्डीकर यांची सोशल मीडियाव...
Continue reading
अवैध सावकारीच्या तावडीतून शेतकऱ्याची २ हेक्टर २ आर जमीन मुक्त
जिल्हा निबंधक गीतेशचंद्र साबळे यांचा महत्त्वपूर्ण आदेश; पाथर्डी येथील मूळ शेतमालक रामदास गायगोळ यांना जमीन परत
अवैध ...
Continue reading
राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट; तिघांना क्लिनचिट, चार्जशीटमधून नेमकं काय समोर आलं?
उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात मोठी अपडेट समोर आल...
Continue reading
हुतात्म्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे : अमित आझाद
चंद्रशेखर आझाद यांचे वंशज अमित आझाद यांचा अकोल्यात सत्कार; स्वातंत्र्यसंग्रामाचा खरा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोच...
Continue reading
शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीर; ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
अकोल्यात कृषिमंत्र्यांचा सत्कार; पंचनामे आणि अहवाल...
Continue reading
शेवगा फाट्यावर तामगाव पोलिसांची मोठी कारवाई; चिल्ड्रन बँकेच्या नोटांनी फसवणूक करणारे ४ आरोपी अटकेत
संग्रामपूर : बनावट नोटांच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करण्याच्या तयारीत असलेल्...
Continue reading
लोकप्रतिनिधींचा काजू-बादामावर ताव; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, प्रशासनाला सुनावले
दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक सुरू असताना काजू-बादाम खातानाचा व्हिडीओ ...
Continue reading
फडणवीसांचा ठाकरेंना टोला; ‘तुमसे ना हो पायेगा’ आंदोलनावरून म्हणाले, “हे नाकार्त्यांचं आंदोलन”
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसे...
Continue reading
अकोट फाईल आणि जिल्ह्यातील अनेक दुचाकी चालक, पादचारी व पशुपक्ष्यांना नायलॉन मांजामुळे आधीच गंभीर दुखापती झाल्या असून काहींना जीवितहानी देखील झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन, सेवाभावी संस्था व माध्यमांमार्फत जनजागृती सुरू असतानाही बेकायदेशीर विक्री सुरू असल्याने पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बदेली रेड्डी व उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक रहीम शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव, पो. उपनि. अख्तर शेख, पो. हवा. प्रशांत इंगळे, पो. हवा. हर्षल श्रीवास, पोका. ईमरान शाह, पोका. अमिर व पोका. लिलाधर खंडारे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
सदर प्रकरण नागरिकांसाठी चेतावणी ठरते; शासनाच्या बंदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध पोलिस प्रशासन सतत लक्ष ठेवत असून, सुरक्षिततेसाठी जनजागृती व कडक कारवाईचा संपूर्ण परिसरात परिणाम होत असल्याचे अधिकारी सांगतात.
read also : https://ajinkyabharat.com/maitricha-maha-kumbh-after-30-years-school-filled-in-shendurjan/