पातूर (प्रतिनिधी) : पातूर तालुक्यातील चोंढी येथील महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप मोठ्या उत्साहात झाला. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग सादर करून बाल वैज्ञानिकांची प्रतिभा आणि सर्जनशीलता दाखवली.
प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता अंकुश ससाने यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष गणपत राठोड होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्या प्रतिभाताई राठोड, गटशिक्षणाधिकारी प्रवीण डाबेराव, गट साधन व्यक्ती राजेंद्र कटरे, विज्ञान अध्यापक मंडळाचे तालुकाध्यक्ष सुनील वावगे, शाळेचे प्राचार्य मनोहर कापडे, केंद्रप्रमुख गणेश ठाकरे, मुख्याध्यापक नरेंद्र भटकर, पोलीस पाटील सुवर्णाताई ठाकरे, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन लठाड व उपसरपंच ब्रह्मदेव ठाकरे उपस्थित होते.
समारोपीय कार्यक्रमास जिल्हा परिषद अकोला येथील माध्यमिक उपशिक्षणाधिकारी भालेराव, विस्तार अधिकारी निवास चव्हाण, संतोष राठोड, नूतन विद्यालय आलेगावचे अध्यक्ष सुभाष जैन तसेच जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र भास्कर यांची उपस्थिती लाभली.
Related News
DJ च्या दणदणाटाचा मंत्र्यालाच फटका! गुलाबराव पाटलांचा दावा; एका कानाने 40% ऐकू येईना
“तुम्ही आडवे या, मराठ्यांना एक जरी काठी लागली तर…” Manoj Jarange Patil चा सरकारला थेट इशारा!
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या ओएसडी आणि फोटोग्राफरचे विमान लंडनऐवजी थेट झ्युरिकला; तांत्रिक बिघाडाने उडाली खळबळ
Nepal मध्ये पुन्हा महासंकट! पुरानंतर काठमांडू हादरले; 5.0 तीव्रतेच्या भूकंपाने भीती
मुंबईत दहीहंडीला गालबोट! दुपारी 12 वाजेपर्यंत 22 गोविंदा जखमी
IMD Alert : महाराष्ट्रासह 17 राज्यांना वादळी पावसाचा महाअलर्ट! ताशी 60 किमी वेगाने वारे
मतदार यादीवरून राज्यात राजकीय रणकंदन; 250 BLA उद्धव ठाकरेंच्या भेटीला!
Manoj Jarange Patil पुन्हा आक्रमक; भुजबळांवर बोचरी टीका, म्हणाले…
Chief Minister Devendra Fadnavis ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात अकोल्यात; 1 हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण!
‘नशा मुक्त युवा, ड्रग फ्री इंडिया’; PM नरेंद्र मोदींचा तरुणांना मोठा संदेश
कुरणखेडच्या गजानन महाराज विद्यालयाचा कायापालट! माजी विद्यार्थ्यांकडून 10 हून अधिक भौतिक सुविधांचे लोकार्पण
मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर गायकवाड कुटुंबावर दु:खाचा डोंगर; पतीनंतर पत्नीनेही उचललं टोकाचं पाऊल
या प्रदर्शनात माध्यमिक गटातून ३० तर प्राथमिक गटातून ३३ प्रयोग सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विषयानुरूप सर्जनशील प्रयोग सादर केले, जे विज्ञान शिकण्याच्या प्रक्रियेत नविन दृष्टिकोन देणारे ठरले. प्रा. डॉ. भास्कर यांनी असे मत व्यक्त केले की, या प्रयोगांमुळे भविष्यात सक्षम शास्त्रज्ञ घडतील. उत्कृष्ट प्रयोगांची निवड करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले असून, हे प्रयोग आता जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी पाठविले जाणार आहेत.
कार्यक्रमास शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाल वैज्ञानिकांच्या या प्रतिभावंत प्रयोगांमुळे विज्ञानात रस निर्माण झाला असून, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले.
read also : https://ajinkyabharat.com/abdul-rashid-khan-thackeray-group-entry-chhatrapati-sambhaji/
