स्वस्त धान्य दुकानदारांचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

राज्यातील

राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदारांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्याची पूर्तता करून

धान्य वितरणामध्ये येणाऱ्या दैनंदिन अडीअडचणींची सोडवणूक करण्यासाठी

शहरातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांच्यावतीने

Related News

मूर्तिजापूर तहसील कार्यालय परिसरात एक दिवसीय धरणे आंदोलन करून

निरीक्षक अधिकारी चैताली यादव यांना निवेदन देण्यात आले.

मागील अनेक वर्षांपासून स्वस्त धान्य दुकानदार

व केरोसीन परवानाधारकांच्या मागण्या अडचणी व समस्या

यांची सोडवणूक करण्याकरिता कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

१० जानेवारी २०२४ रोजी अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांच्या उपस्थितीत

राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.

त्या बैठकीत राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या

तसेच उत्पन्नात ५० रुपयांनी वाढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली होती

आणि लवकरच त्या निर्णयावर अंमलबजावणी करण्यात येईल,

असे आश्वासन अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्याकडून देण्यात आले;

मात्र अद्यापही या निर्णयावर अंमलबजावणी झाली नसून,

या विषयावर चर्चा करण्याकरिता राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर

कोणतीही बैठक झालेली नसल्याने तसेच

राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदारांच्या प्रशांवर आणि प्रलंबित मागण्यांवर

राज्य शासनाचे लक्ष वेधण्याकरिता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये

त्रिस्तरिय आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये

आजच्या महागाई निर्देशांकानुसार किमान १०० रुपये प्रति किंटल इतकी वाढ करण्यात यावी.

शासकीय धान्य गोदामातून येणाऱ्या धान्याच्या गोणी वजनात

५० किलोपेक्षा कमी भरत असल्यामुळे प्रत्यक्ष दुकानांमध्ये

या गोणीचे वजन करून देण्यात यावे,

तसेच देण्यात येणारे धान्य हे स्वच्छ व मनुष्यास खाण्यासाठी योग्य असावे,

अस्वच्छ आणि खराब धान्याचा पुरवठा करण्यात येऊ नये.

अन्नसुरक्षा कायद्याद्वारे महाराष्ट्र राज्यासाठी मंजूर असलेल्या

७,००,१६,६८३ इतक्या इष्टांक मयदित पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी

प्रत्येक तहसील कार्यालयात शिधापत्रिकेसंबंधित

ऑनलाइन डेटाएन्ट्रीची सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत.

याकरिता संपूर्ण राज्यातील रास्त भाव दुकानदारांना लॉगिन उपलब्ध करून देण्यात यावेत.

अश्या मूर्तिजापूर तहसील कार्यालय परिसरात एक दिवसीय धरणे आंदोलन करून

संघटनेच्यावतीने निरीक्षक अधिकारी चैताली यादव यांना निवेदन देण्यात आले.

Read also: https://ajinkyabharat.com/sirso-gairanatil-tribal-phasepardhi-community-deprived-of-development/

Related News