नाग अश्विन लिखित आणि दिग्दर्शित ‘कल्की २८९८ एडी’

कसा

कसा आहे हा चित्रपट? वाचा रिव्ह्यू

सायन्स फिक्शन मिथोड्रामा, तीन तासांचा चित्रपट, अर्धा डजन सुपरस्टार, हॉलीवूडसारखा VFX,

Related News

अमिताभ बच्चन-प्रभासचा अप्रतिम ॲक्शन सीक्वेन्स !!

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभास, कमल हासन,

अमिताभ बच्चन आणि दीपिका पादूकोण हे महत्त्वाच्या भूमिकेत असलेला

‘कल्की 2898 एडी’ हा २०२४ या वर्षातील बहुप्रतिक्षीत चित्रपट आहे.

आज २७ जून रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

सायन्स फिक्शन मिथोड्रामा असलेल्या या चित्रपटाची लांबी 3 तास आहे,

आता हा चित्रपट कसा आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाची कथा कुरुक्षेत्रामध्ये सुरु होते.

कथेच्या सुरुवातीलाच भगवान कृष्ण हे द्रोणाचार्य यांचा मुलगा अश्वत्थामाला शाप देतात.

हा शाप जीवनातील अनंत काळासाठी असतो.

त्याला या शापातून तेव्हाच मुक्ती मिळेल जेव्हा तो कल्कीला भविष्यातील जन्मात मदत करेल.

तोपर्यंत अश्वत्थमाला जीवनात प्रचंड दु:ख सहन करावे लागणार आहे.

श्रीकृष्ण अश्वत्थामाला सांगतात की हजारो वर्षांनंतर,

जेव्हा जगाच्या कानाकोपऱ्यात फक्त वाईटच असेल,

जेव्हा लोकांवर अत्याचार वाढू लागतील,

तेव्हा देवाचा अवतार असलेल्या कल्कीचा जन्म होईल.

मात्र, त्याचा जन्म सोपा होणार नाही.

त्यासा पृथ्वीवर येण्यापासून रोखण्यासाठी आसुरी शक्ती पूर्ण शक्ती वापरतील.

या स्थितीत अश्वत्थामाला देवाचे रक्षण करून आपले पाप धुण्याची संधी मिळेल.

त्यानंतर चित्रपटाची कथा ही ६००० वर्षे पुढे जाते.

आणि काशी या जगातील शेवटच्या शहरापर्यंत पोहोचते.

या शहराच्या आत ‘कॉम्प्लेक्स’ नावाचे वेगळे साम्राज्य आहे.

या काळात सर्व काही पैशांऐवजी इलेक्ट्रीक युनिटवर चालते.

या सगळ्यात कमल हासन साकारत असलेले पात्र हे एका मोहिमेवर असते.

ही मोहिम अतिशय महत्त्वाची आणि तितकीच धोकादायक असते.

प्रभास आणि दीपिका हे काशीमध्ये राहणारे एक आनंदी कपल आहे.

अमिताभ बच्चन यांनी चित्रपटात अश्वत्थामाची भूमिका साकारली आहे.

तर प्रभास हा भैरवाच्या भूमिकेत दिसत आहे.

अभिनेत्री दीपिका पादूकोणने सुमथीची भूमिका साकारली आहे.

सुमथीच्या पोटी कल्कीचा जन्म होणार असतो.

भैरव हा सुमथीची गरोदरपणात काळजी घेत असतो.

आता अश्वत्थामा या शापातून मुक्त होतो का?

कमल हासन यांची मोहिम नेमकी आहे तरी काय?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावर मिळणार आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/sam-pitroda-once-again-appointed-as-overseas-congress-chief/

Related News