CBI तपासातून मोठा खुलासा
नॅशनल टेस्टींग एजन्सी म्हणजेच एनटीए मार्फत घेण्यात येणारी युजीसी नेट परीक्षा
रद्द करण्यात आली आहे.
Related News
RSS On CJP Protest : जंतर-मंतरवरील आंदोलनामागचं कारण काय? RSS ने मांडलं विश्लेषण
मागील महिन्यात राजधानी दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीकडून करण्यात आलेल्या ...
Continue reading
CJP आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सेलिब्रिटींना सुरेश ओबेरॉय यांनी सुनावलं; म्हणाले, आधी सत्य समजून घ्या
ज्येष्ठ अभिनेते सुरेश ओबेरॉय यांनी CJP म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोल...
Continue reading
Modi Cabinet Reshuffle : केंद्रात मोठ्या मंत्रिमंडळ फेरबदलाच्या हालचाली; शिंदेंनाही कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या मंत्र...
Continue reading
Abhijeet Deepke : अभिजीत दिपकेंच्या CJP वर खळबळजनक आरोप; पॅलेट गनच्या छऱ्यांमुळे जखमी तरुणाने व्यक्त केली नाराजी
नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरून देशभरात मोठा संताप व...
Continue reading
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? शिंदेंना आणखी एक मंत्रिपद मिळणार; धर्मेंद्र प्रधानांचीही पुन्हा एन्ट्री होण्याची शक्यता
केंद्रातील राजकीय वर्तुळातून सध्या मोठी बातमी समोर येत आ...
Continue reading
धर्मेंद्र प्रधान यांचा धक्कादायक दावा; राजीनाम्यावर पहिल्यांदाच खुलासा, थेट म्हणाले, “युवा पिढीची दिशाभूल करण्यात आली”
नीट पेपरफुटीच्या आरोपांनंतर देशभरात मोठे आंद...
Continue reading
अभिजीत दिपके यांच्याकडून मोठे संकेत! ‘राजकारणात जाण्याची इच्छा नाही, पण...’; CJP च्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता
छत्रपती संभाजीनगरमध्ये CJP ची दोन दिवसीय महत्त्वाची बैठक; ...
Continue reading
नीट पेपरफुटीनंतर मोदी सरकार सावध! खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कानमंत्र; युवकांशी संवाद वाढवण्याचे स्पष्ट निर्देश
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर...
Continue reading
मोहन भागवत साधणार Gen-Z शी संवाद? अभिजीत दीपकेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले, “नवीन चेहरे पुढे आले पाहिजेत”
जंतर-मंतर आंदोलनानंतर पुन्हा चर्चेत आले अभिजीत दी...
Continue reading
अभिजीत दिपके यांचा मोठा खुलासा! अमेरिकेतील शिक्षणाचा खर्च शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्जातून; आरोपांवर दिले सविस्तर उत्तर
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिज...
Continue reading
Eknath Shinde Shivsena : जेंझी मतदारांवर शिवसेनेचा फोकस, एकनाथ शिंदेंचा मोठा प्लॅन; 2029 च्या निवडणुकांसाठी रणनीतीला सुरुवात?
जेंझी आंदोलनानंतर बदलले राजकीय समीक...
Continue reading
सरकारचे टेन्शन वाढले? अभिजीत दिपके यांच्या घरी CJP ची महत्त्वाची बैठक; 15 ते 20 प्रमुख सदस्यांची उपस्थिती, पुढील रणनीतीवर चर्चा
छत्रपती संभाजीनगरमध्ये कोअर कमिटीची...
Continue reading
युजीसी नेट परीक्षेच्या पेपरफुटीवरुन मोठा वाद निर्माण झाला होता,
त्यानंतर गृहमंत्रालयाने शिक्षण विभागाला युजीटी नेट परीक्षेत घोटाळा झाल्याचे सांगितले.
त्यानंतर, शिक्षण मंत्रालयाने संबंधित नेट परीक्षेचा पेपर रद्द केला आहे.
याप्रकरणी तपास करत असलेल्या सीबीआयच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे.
युजीसीट नेट परीक्षेचा पेपर लीक झाला होता,
परीक्षेच्या एक दिवस अगोदर हा पेपर लीक होऊन
डार्कनेटवर टाकण्यात आला होता, असेही सीबीआयने म्हटलं आहे.
केंद्र सरकारने युजीसी नेटचा पेपर रद्द केल्यानंतर
या पेपरफुटीप्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे.
त्यामुळे, युजीसी नेटचा पेपर नेमकं कसा लीक झाला, लीक झाला की नाही,
या अनुषंगाने तपास केला जात आहे.
सीबीआयच्या प्राथमिक तपासात नेट परीक्षेचा पेपर
17 जून रोजी लीक झाल्याचे समोर आले आहे.
विशेष म्हणजे पेपर लीक झाल्यानंतर तो
एंक्रिप्टेड सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकण्यात आला.
त्यानंतर, आपली चोरी उघडकीस येऊ नये म्हणून हा पेपर डार्कनेटवर टाकण्यात आला होता.
सीबीआयच्या प्राथमिक तपासात या गोष्टी समोर आल्यानंतर,
आता सीबीआयकडून अधिक तपास सुरू आहे.
त्यासाठी, एनटीए आणि इतर एजन्सींकडून माहिती घेतली जात आहे.
शिक्षण मंत्रालयाने एनटीएद्वारे आयोजित युजीसी-नेट परीक्षेचा पेपर
बुधवारी 19 जून रोजी रद्द केल्याचे जाहीर केले.
त्यानंतर, याप्रकरणाचा तपास तत्काळ सीबीआयकडे देण्यात आला.
विशेष म्हणजे 18 तारखेला म्हणजे पेपर रद्द होण्याच्या एक दिवस अगोदरच
9 लाख विद्यार्थ्यांनी नेट परीक्षेचा पेपर दिला होता.
दरम्यान, लवकरच युजीसी नेट परीक्षेसाठी नवीन तारीख जाहीर करु,
असे शिक्षण मंत्रालयाने 20 जून रोजी जाहिर केले.
परीक्षेच्या तारखांसह महत्त्वाच्या सूचनांचीही घोषणा केली जाणार आहे.
नेट परीक्षेचा पेपर लीक झाल्यानंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर
चोहोबाजूंनी टीका होऊ लागली.
त्यामुळे, याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही प्रधान यांनी स्पष्ट केले.
Read also: https://ajinkyabharat.com/obc-movement-yevlewale-jarange/