खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर
भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडले आहेत.
Related News
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
ईस्टर संडेच्या तयारीने धार्मिक वातावरण भारावले
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
चित्तौडगडमध्ये ‘द बर्निंग कार’! कलेक्ट्रेटजवळ उभी असलेली कार पेटली
“अंबाजोगाईत वकिल महिला बळी ठरली एका कटाचा?
मंगळवारी (दि.18) निज्जरच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त
कॅनडाच्या संसदेत मौन पाळण्यात आले.
यावरुन आता एका भारतीय वंशाच्या खासदाराने
कॅनडाच्या संसदेतून खलिस्तानी समर्थकांवर जोरदार टीका केली.
खासदार चंद्रा आर्य यांनी संसदेला
खलिस्तानी दहशतवाद्यांनी कॅनडियन विमानाला बॉम्बने उडवल्याचीही आठवण करून दिली.
चंद्रा आर्य म्हणाले की, खलिस्तानी दहशतवादी भारताचेच नव्हे,
तर कॅनडाचेही नुकसान करत आहेत. यावेळी त्यांनी 1985 मध्ये
एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये झालेल्या स्फोटाची आठवण करून दिली.
तसेच, त्यांनी 23 जून रोजी 1985 च्या बॉम्बस्फोटातील बळींच्या स्मरणार्थ
एका कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे माहिती दिली
आणि सर्वांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही केले.
23 जून 2024 रोजी राजधानी ओटावा येथील
डाऊ लेकजवळील स्मारकाच्या ठिकाणी आणि
ओंटारियोमधील क्वीन्स पार्कमध्ये दुपारी 12 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
चंद्रा संसदेत बोलताना म्हणाले की,
खलिस्तानी समर्थक देशात हिंसाचाराला प्रोत्साहन देत आहेत.
23 जून हा दहशतवादामुळे बळी पडलेल्यांचा स्मृतिदिन आहे.
39 वर्षांपूर्वी याच दिवशी एअर इंडियाचे विमान हवेत असताना उडवण्यात आले होते.
त्या घटनेत 329 प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला होता.
कॅनडाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा हल्ला होता,
ज्यात एकूण 268 कॅनेडियनही ठार झाले होते.
नुकतंच भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी,
यांच्या हत्येचा कॅनडाच्या संसदेत जल्लोष साजरा करण्यात आला.
यावरुन देशात काळ्या शक्ती पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येते, अशी टीकाही केली.
Read also: https://ajinkyabharat.com/because-of-the-central-governments-mischief-you-became-a-disgrace/