मुख्यमंत्री “माझी शाळा सुंदर शाळा” उपक्रमाची माहिती

माझी शाळा सुंदर शाळा

शालेय प्रशासन, ऑनलाईन कामे व पोषण योजनेवर चर्चा

अकोट – जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अकोला यांच्या निर्देशानुसार माहे नोव्हेंबर २०२५ ची बोर्डी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद २९ नोव्हेंबर २०२५ रोजी पीएमश्री जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, बोर्डी पं.स.अकोट येथे सकाळी ११ ते २ वाजता यशस्वीरीत्या संपन्न झाली. व्यासपीठावर केंद्रप्रमुख उमेश चोरे सर, उच्च श्रेणी मुख्याध्यापक काजी अतिक सर आणि बुलडाणा जिल्हा समुपदेशक व तज्ज्ञ मार्गदर्शक अरविंद शिंगाडे सर उपस्थित होते. शिक्षण परिषदेचे औपचारिक उद्घाटन प्रतिमापूजनाने झाले.

परिषदेचे पहिले मार्गदर्शन जिल्हा समुपदेशक अरविंद शिंगाडे यांनी “शालेय नेतृत्व व आजच्या काळातील शिक्षकाची भूमिका” या विषयावर केले. त्यानंतर डॉ. जयंत नारळीकर व विनोद तळोकार सरांनी गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमाबाबत शिक्षकांचे मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री “माझी शाळा सुंदर शाळा” टप्पा क्र. ३ उपक्रमाची माहिती महेंद्र काकड सरांनी दिली, तर SQAAF विषयांतर्गत आनंद नांदुरकर सरांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.

केंद्रप्रमुख उमेश चोरे सरांनी प्रास्ताविक, प्रशासकीय सूचना व स्थलांतरित बालक व पालकांचे सर्वेक्षण याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षकांमध्ये UDISE, संच मान्यता, ऑनलाईन कामे, विद्यार्थी सुरक्षा, VSK ॲपवर उपस्थिती नोंदविणे, PAT परीक्षेचे गुण ऑनलाईन भरने, हिंदकी चादर निपुण ॲपवर पालकांचे मोबाईल नंबर नोंदणी, शालार्थ प्रणालीवरील शिक्षक माहिती अपडेट करणे, प्रधानमंत्री पोषण शकती योजनेत मेनू चार्टनुसार आहार बनविणे व दैनिक उपस्थिती वेळेत भरणे यासंबंधी चर्चा झाली.

Related News

शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन ज्ञानेश्वर खापरकर यांनी केले. बोर्डी केंद्रातील सर्व शिक्षकांनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला आणि चर्चेत सक्रियतेने भाग घेतल्यामुळे परिषद यशस्वी ठरली.

read also : https://ajinkyabharat.com/borgaon-manju-naveen-bypass-a-huge-accident-was-averted-by-the-car-parked-in-the-truck/

Related News