वंचितच्या पराभूत उमेदवाराने एकाच दिवशी बुक केल्या चार कोटींच्या गाड्या!

सोशल

सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा!

वंचित बहुजन आघाडीचे लातूर लोकसभा मतदारसंघातून

पराभूत झालेले उमेदवार नरसिंग उदगीरकर

Related News

यांनी एकाच दिवशी चार कोटी किमतीच्या गाड्या बुक केल्या.

त्यांनी टाकलेली नव्या गाडीसह पोस्ट व्हायरल होत असून

सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

त्यावर नरसिंग उदगीरकर यांच्या मुलाने स्पष्टीकरण दिलं आहे.

लातूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार

राहिलेले नरसिंग उदगीरकर हे सध्या सोशल मीडियावर

प्रचंड व्हायरल झाले आहेत.

लातूर लोकसभा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ आहे.

या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे हे 61,881 मताने

निवडून आले आहेत.

त्यांनी भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांचा पराभव केला होता.

सर्वाधिक तिसरी मते घेणारे उमेदवार म्हणजे

वंचित बहुजन आघाडीचे नरसिंग उदगीरकर.

नरसिंग उदगीरकर यांना 42 हजार 225 मते पडली होती.

निवडणुकीच्या काळात नरसिंग उदगीरकर हे जेवढे चर्चेत नव्हते

त्यापेक्षा अधिक पराभूत झाल्यानंतर चर्चेत आले आहेत.

त्याला कारण म्हणजे त्यांनी एकाच दिवशी घेतलेल्या गाड्या.

एक रेंज रोवर आणि एक फॉर्च्यूनर अशा दोन गाड्या त्यांनी घेतल्या आहेत.

या गाड्यांची डिलिव्हरी सहा महिन्यानंतर होणार आहे.

सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट पडली आणि चर्चेला उधाण आलं.

Read also: https://ajinkyabharat.com/vitamin-d-is-important-for-childrens-physical-and-mental-development/

Related News