27 बॉलमध्ये वेगवान शतक, 18 सिक्ससह 144 धावा, साहिल चौहान ने रचला विश्वविक्रम

आयसीसी

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचा थरार सुरु आहे.

सुपर 8 साठी 8 टीम निश्चित झाल्या आहेत.

Related News

19 जूनपासून सुपर 8 फेरीला सुरुवात होणार आहे.

अशात क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे.

एस्टोनियाच्या 32 वर्षीय साहिल चौहान याने वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली आहे.

साहिलने ऐतिहासिक कामगिरी करत साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष

आपल्याकडे वेधून घेतलं आहे.

साहिलने अवघ्या 27 बॉलमध्ये T20I क्रिकेटमध्ये वेगवान शतक ठोकत

वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

साहिलने नामिबियाच्या निकोल लोफ्टी-ईटन याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केलाय.

इतकंच नाही, तर साहिलने केलेल्या नाबाद 144 धावांच्या खेळीमुळे

एस्टोनियाने सायप्रस विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात

6 विकेट्सने शानदार विजय मिळवला.

एस्टोनिया विरुद्ध सायप्रस यांच्यात टी 20 मालिका खेळवण्यात येत आहे.

या मालिकेतील दुसऱ्या टी 20 सामन्यात साहिल चौहानने विजयासाठी

मिळालेल्या 192 धावांचा पाठलाग करताना ही विस्फोटक खेळी केली.

सायप्रसने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला.

सायप्रसने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 191 धावा केल्या.

त्यामुळे एस्टोनियाला 192 धावांचं आव्हान मिळालं.

टी 20 क्रिकेटमध्ये आव्हान हे अवघडच होतं.

मात्र साहिलने केलेल्या या झंझावातामुळे एस्टोनिया हे आव्हान

अवघ्या 13 ओव्हरमध्ये 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

एस्टोनियाने 7 ओव्हर राखून 4 विकेट्सने गमावून 194 धावा केल्या.

साहिलने 27 बॉलमध्ये तडाखेदार शतक झळकावलं.

साहिलने अवघ्या 14 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं.

त्यानंतर साहिलने फक्त 13 बॉल्सच्या मदतीने शतक पूर्ण केलं आणि विश्व विक्रम केला.

Read also: https://ajinkyabharat.com/village-kajleshwar-panibani-in-varkhed-in-front-of-the-district-magistrates-office/

Related News