वारूळा जिल्हा परिषद शाळेत उत्साहात संविधान दिवस साजरा

वारूळा जिल्हा परिषद

अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वारुळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता विद्यार्थ्यांसह शिक्षक, गावातील प्रतिष्ठित महिला आणि नागरिकांच्या उपस्थितीत संविधानाची भव्य प्रभात फेरी काढत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

प्रथम गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांचे पूजन व हारार्पण करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या आवारात संविधान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला औपचारिक सुरुवात करण्यात आली. संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करत उपस्थितांनी संविधान मूल्यांची उजळणी केली.

Related News

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा आरती वानखडे उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षक नाना पाटील मोहोकार, अरुण बाबुळकर, उपसरपंच आम्रपाली धांडे, मंगेश पाटणे, आशा सेविका कविता वानखडे, अंगणवाडी सेविका प्रेमलता मोहोकार, मदतनीस सुनिता वानखडे आदींची उपस्थिती लाभली. मान्यवरांनी संविधानाचे महत्त्व, त्यातील मूल्ये, तसेच नागरिकत्वाच्या कर्तव्यांची माहिती देत विद्यार्थ्यांना

प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार राजकुमार वानखडे यांनी केले. मुख्याध्यापक अरुण फुलारी यांनी सुबक व नेमकेपणाने कार्यक्रमाचे संचलन केले, तर श्रद्धा मोहोकार यांनी आभार प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करून कार्यक्रमाला आनंदमयी स्वरूप देण्यात आले. विशेष म्हणजे, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग घेतल्याबद्दल मुख्याध्यापक अरुण फुलारी यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमासाठी जयश्री बाबुळकर, कुसुम थोरात, सुनिता धांडे यांसह असंख्य नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. संपूर्ण कार्यक्रमात संविधान दिनाचा उत्साह आणि जागरूकतेचा सूर सर्वत्र अनुभवायला मिळाला.

read also : https://ajinkyabharat.com/constitution-day-celebrated-with-enthusiasm-at-district-school-lohari-khu/

Related News