कारंजा तालुक्यातील मनभा गावात चिया पिकाची पेरणी सुरू झाली असून शेतकऱ्यांना या नव्या आणि उच्च मूल्य असलेल्या पिकाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी श्री. प्रवीण ठाकरे यांनी प्रत्यक्ष शेतात भेट देत सविस्तर मार्गदर्शन केले.
ठाकरे यांनी चिया पिकाचे हवामानाशी सुसंगत वैशिष्ट्ये, पाण्याची कमी आवश्यकता, बाजारातील वाढती मागणी आणि अल्प कालावधीत उत्पादन देणारी क्षमता याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. तसेच मातीची तयारी, योग्य बियाण्याची निवड, पेरणीचे अंतर, खत व्यवस्थापन आणि तण नियंत्रणाचे उपाय याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले.
ठाकरे यांनी सांगितले,“चिया हे परवडणारे, कमी खर्चात घेता येणारे आणि जास्त उत्पन्न देणारे पीक असून शेतकऱ्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरू शकते.”मनभा येथील शेतकऱ्यांनी या पिकाबाबत उत्सुकता व्यक्त केली असून उपलब्ध मार्गदर्शनाचा फायदा घेण्याचे समाधानही व्यक्त केले. या पिकाची सुरुवात मनभा परिसरात आधुनिक शेतीच्या दिशेने केलेले एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
या पेरणीमध्ये सहभागी झालेले प्रमुख शेतकरी: विजय ज्ञानेश्वर ठोंबरे, सचिन ठोंबरे, रमेश बोलके.
