मृतदेह ,चिता आणि ‘94’ अंकाचं रहस्य, राखेवर हा अंक नेहमी का लिहिला जातो?

94

Manikarnika Ghat : काशी नगरी ही भगवान महादेवाची नगरी म्हणून ओळखली जाते, आणि या नगरीत मोक्ष मिळतो असे मानले जाते. जीवन आणि मृत्यूच्या संगमाला साक्ष देणारा मणिकर्णिका घाट अनेक प्रथा, श्रद्धा आणि शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरांसाठी प्रसिद्ध आहे.

अंत्यसंस्कारानंतर राखेवर ‘94’ हा अंक लिहिण्याची एक आगळीवेगळी परंपरा येथे पाहायला मिळते. अनेकांना हा अंक लिहिण्यामागील नेमकं कारण माहीत नसतं, परंतु स्थानिक मान्यतानुसार ही परंपरा पिढ्यान्‌पिढ्या चालत आली आहे.

94 अंक का लिहिला जातो?

स्थानिक श्रद्धेनुसार मानवाचे एकूण 100 कर्म असतात.त्यापैकी 94 कर्मे ही स्वतःची मानली जातात, म्हणजेच त्या कृतींसाठी तो व्यक्ती स्वतः जबाबदार मानला जातो.उरलेली 6 कर्मे जीवन-मृत्यू, यश-अपयश, लाभ-हानी यांसंबंधीची असून ती देवाच्या हातात आहेत, असे मानले जाते.म्हणूनच,अंत्यसंस्कारानंतर उरलेल्या राखेवर 94 हा अंक लिहून त्या व्यक्तीच्या 94 कर्मांचे दहन झाले, अशी भावना व्यक्त केली जाते.उरलेली 6 कर्मे ईश्वराधीन मानून त्या आत्म्याला मोक्षाची प्राप्ती होवो, असा अर्थही यातून घेतला जातो.या प्रथेत लाकडाने किंवा हाताच्या बोटाने राखेवर 94 लिहिले जाते आणि त्यानंतर अस्थिविसर्जन प्रक्रिया केली जाते.

शास्त्रीय आधार नाही

मणिकर्णिका घाटावरील ही परंपरा कोणत्याही धार्मिक ग्रंथात किंवा शास्त्रीय आधारात स्पष्टपणे नमूद नाही.ही एक स्थानिक श्रद्धा आणि रूढी आहे, जी शतकानुशतकांपासून पुढे चालत आली आहे.

Disclaimer

वरील माहिती ही स्थानिक श्रद्धा आणि उपलब्ध प्राथमिक माहितीच्या आधारे देण्यात आलेली आहे.या प्रथेला शास्त्रीय किंवा अधिकृत मान्यता असल्याचे आम्ही पुष्टी करत नाही किंवा प्रोत्साहन देत नाही.
अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नसून, केवळ माहितीपर उद्देशाने हा लेख सादर करण्यात आला आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

read also : https://ajinkyabharat.com/kashmir-times-raid-and-serious-allegations-attempt-to-spread-gossip-by-journalist/