लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शेगाव येथील
संत गजानन महाराजांची पालखी यंदा १३ जून २०२४ रोजी
Related News
आषाढी वारीसाठी पंढरपूर करिता मार्गस्थ होणार आहे.
सकाळी ७ वाजता भक्तीमय वातावरणात धार्मिक सोपस्कार पार पाडून
श्रींची पालखी संत नगरी शेगावातून पंढरपूरकडे मार्गक्रमण करेल.
यंदा पालखीचे ५५ वे वर्ष असून शेगावहून जाताना ३३ दिवसांची पायदळ वारी करीत
वारकरी पंढरीत दाखल होणार आहेत.
१३ जून रोजी सकाळी ७ वाजता ७०० वारकरी भक्तांसंगे
श्री संत गजानन महाराजांची पालखी विठ्ठलाच्या पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे.
पहिल्या दिवशी दुपारी नागझरी व रात्री पारस येथे मुक्काम राहील.
३३ दिवसांच्या प्रवासात पालखी ठिकठिकाणी मुक्कामी राहणार आहे.
शेकडो किलोमीटरचे अंतर पार करून १५ जुलै रोजी पालखी
श्रीक्षेत्र मंगळवेढावरून विठुरायाच्या पंढरीत दाखल होणार आहे.
१५ जुलै ते २० जुलै पालखीचा पंढरपूरमध्ये मुक्काम राहणार असून
२१ जुलै रोजी पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल.
या पालखी सोहळ्यात जवळपास ७०० वारकरी, २५० पताकाधारी,
२५० टाळकरी, २०० सेवेकरी, २ रूग्ण वाहिका, ३ मालट्रक,
३ अश्व, १ प्रवासी बस सहभागी असतात.
गजानन महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम १३ जून रोजी पारस येथे होणार आहे.
१४ जून भौरद, १५ व १६ जून २ अकोला, १७ जून वाडेगाव,
१८ जून पातुर, १९ जून श्री क्षेत्र डवहा, २० जून श्री क्षेत्र शिरपूर,
२१ जून महसला पेन, २२ जून रिसोड, २३ जून सेनगाव,
२४ जून दिग्रस, २५ जून जवळा बाजार, २६ जून श्री क्षेत्र त्रिधारा,
२७ जून २ परभणी, २८ जून दैठणा, २९ जून गंगाखेड,
३० जून परळी थर्मल, १ जुलै परळी वैजनाथ,
२ जुलै अंबाजोगाई, ३ जुलै बोरी सावरगाव,
४ जुलै कळंब, ५ जुलै तेरणा सहकारी साखर कारखाना,
६ जुलै उपळा, ७ जुलै धाराशिव, ८ जुलै श्रीक्षेत्र तुळजापूर, ९ जुलै उळे,
१० व ११ जुलै सोलापूर, १२ जुलै तिरहे, १३ जुलै मानपूर, १४ जुलै श्री क्षेत्र मंगळवेढा
तर १५ जुलै रोजी ९ पंढरपूर येथे पालखीचे आगमन होईल.
१५ जुलै ते २० जुलै पर्यंत पालखीचा ९ पंढरपूर मुक्काम राहणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रामधून श्री क्षेत्र पंढरपूरला बहूतेक सर्व संतांच्या पालख्या
दिंडीसह नेण्याची परंपरा आहे.
भक्त आणि भाविकांना तीर्थयात्रा घडाव्यात आणि वारकरी सांप्रदायाच्या महान परंपरेची जपणूक व्हावी
या उद्देशाने श्री गजानन महाराज संस्थानने १९६८ पासून श्री क्षेत्र पंढरपूरला पायी वारी
व श्री क्षेत्र आळंदीला मोटारीने पालखी दिंडीसह नेण्याचा अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे.
याशिवाय श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, श्री क्षेत्र पैठण, श्री क्षेत्र मुक्ताईनगर या ठिकाणी देखील
संस्थानची वारी निमित्त पालखी जात असते.
आषाढी वारिकरीता पंढरपूरला जाताना वारकरी दरवर्षी सोबत निघतात.
दिंडीमुळे विवेक, वैराग्य, भक्ती व ज्ञान या तत्त्वांचा लोकांना बोध होतो
व आध्यात्मिक कार्य गतिमान होऊन धर्माप्रती श्रध्दा व भावना वृध्दिंगत होतात.
तसेच लोकजीवनावर आध्यात्मिकतेचा प्रभाव पडण्यास मदत होते.
दारिद्रय, अज्ञान, अंधश्रध्दा, व्यसनाधिनता
अशा अनेक समस्यांनी ग्रासलेली अनेक छोटी गावे पायी वारीच्या वाटेत आहेत.
या गावांमध्ये हरीनामाचा प्रसार करून तेथील ग्रामस्थांचे जीवन आयुष्य सुखकर करणे,
तेथील व्यसनाधिनता, अंधश्रध्दा दूर करणे हे या वारीमागचे आणखी एक कारण.
संस्थानचे पायी वारीकरीता श्री महाराजांची
चांदीची नवीन पालखी बनारस येथील कारागीर आणून तयार करून घेतली आहे.
त्यावरील नक्षीकाम अत्यंत कलापूर्ण असून
ही पालखी पाहाताक्षणीच अंत:करणातील भक्तिभाव उंचबळून येतात.
Read also : चंद्राबाबू नायडू आज घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ ! (ajinkyabharat.com)