अकोट : विद्यांचल द स्कुल येथे बालकांचे हक्क, अधिकार, सुरक्षितता आणि कल्याण याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी ‘बाल संरक्षण व सुरक्षा’ या विषयावर कार्यशाळेचे भव्य आयोजन १७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. मुलांच्या हिताचे रक्षण, शोषण व गैरवापरापासून संरक्षण, तसेच सायबर सुरक्षेबाबत आवश्यक मार्गदर्शन देणे या उद्देशाने ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली.
या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीमती प्रांजली जैस्वाल (सदस्य – बालकल्याण समिती), ऍड. मनीषा भोरे (सेंटर हेड – सखी वन स्टॉप सेंटर), श्री. सुनिल लाडुलकर (जिल्हा बालसुरक्षा आणि कल्याण अधिकारी, अकोला), श्री. महेंद्र गनोदे (चेअरमन – एनकरेज एज्युकेशनल फाऊंडेशन, अकोला) व सौ. प्रिया इंगळे (सखी वन स्टॉप सेंटर, अकोला) यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना बालहक्कांचे महत्त्व स्पष्ट करताना कोणत्याही प्रतिकूल किंवा संशयास्पद परिस्थितीत मुलांनी कसे वागावे, स्वतःचे रक्षण कसे करावे आणि परिस्थितीची योग्य जाणीव करून ती हाताळण्याची कौशल्ये कशी विकसित करावी याबाबत मार्गदर्शन केले. वाढत्या सोशल मीडिया वापरातून उद्भवणारे धोके, सायबर फसवणूक, आणि चुकीच्या सवयी टाळण्याबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. एखाद्या मुलासोबत गैरप्रकार किंवा अत्याचार घडल्यास तात्काळ संपर्क साधता येणारे महत्त्वाचे हेल्पलाइन क्रमांक विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
Related News
खात्यात अचानक पैसे आले… आणि अचानक गेले? सायबर फ्रॉडवर RBIचा मोठा वार; संशयास्पद व्यवहारांवर लागणार ‘डेबिट होल्ड’
RBI : डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर पाहता...
Continue reading
महाराष्ट्र पुन्हा हादरला! खासगी शाळेच्या बस चालकाकडून ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार
नवी मुंबईतील धक्कादायक घटना; आरोपी बस चालकाला अटक, शनिवारपर्यंत पोलीस कोठडी
नवी मुंबई आणि पन...
Continue reading
तुमच्या नावावर ९ पेक्षा जास्त SIM आहेत? अतिरिक्त नंबर होणार बंद; जाणून घ्या नवा नियम
SIM : देशात वाढत्या फ्रॉड कॉल्स, बनावट ओळखपत्रांचा वापर आणि सायबर ग...
Continue reading
पुणे हादरलं! आमदाराच्या गावात 10 वर्षांच्या चिमुकलीला अत्याचारानंतर निर्घृणपणे संपवलं
पुणे : पुणे जिल्ह्यातून पुन्हा एकदा माणुसकीला काळिमा फासणारी आणि मन...
Continue reading
Gen Z नंतर जेन अल्फाची चिंता! 13 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी सोशल मीडिया बॅन? मोदी सरकार आणणार ‘SHIELD Bill’
Social Media-Gaming Ban B...
Continue reading
Whatsapp News : व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांसाठी मोठी अपडेट! अचानक '24 तास Account Under Review'; नेमकं काय घडलं? जाणून घ्या कारण आणि उपाय
लाखो व्हॉट्सॲप यूजर्समध्ये चिंता; 'This account...
Continue reading
Narendra Modi Video : मोदींचा व्हिडिओ फेसबुकवरून डिलीट झाल्याने राजधानीत खळबळ; मेटाच्या ग्लोबल हेडला समन्स, नेमकं काय घडलं?
पंतप्रधान नरें...
Continue reading
Bank of Baroda च्या ग्राहकांनो सावधान! बँकेचा 1 टीबी डेटा लीक झाल्याचा दावा; हॅकर्सकडे खातेधारकांचे डिटेल्स? बँकेने दिलं मोठं स्पष्टीकरण
देशातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकां...
Continue reading
Gmail Privacy : Google AI मुळे तुमचे ईमेल धोक्यात आहेत का? जाणून घ्या सत्य आणि 7 महत्त्वाच्या सेटिंग्ज
आजच्या डिजिटल युगात Gmail हे केवळ ईमेल पा...
Continue reading
School Sex Education : शाळांमध्ये लवकरच लैंगिक शिक्षण? केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती; तज्ज्ञ समितीचा अहवाल तयार
देशभरातील शाळांच्या अभ्यासक्रमात
Continue reading
केंद्र सरकारच्या UMANG App मधील गंभीर सुरक्षा त्रुटींमुळे EPFO UAN, आधार क्रमांक आणि LPG बुकिंगशी संबंधित माहिती लीक झाल्याचा दावा. इलेक्ट्रॉनिक्स आण...
Continue reading
सायबर गुन्हे, डिजिटल अरेस्ट आणि ऑनलाइन फसवणुकीवर आधारित 6 भागांची Weekend Club वेबसीरिज चर्चेत. महाराष्ट्र सायबर विभागाच्या सहकार्याने तयार झालेल्...
Continue reading
कार्यशाळेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांनी कार्यशाळेचे महत्त्व समजून घेत सक्रियपणे सहभाग नोंदवला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय डीन श्री. प्रशांत विनायक यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी समन्वय साधत परिश्रम घेतले. अशा कार्यशाळांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये स्वसंरक्षण, जागरुकता आणि सुरक्षिततेची जाण वाढीस लागते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
read also : https://ajinkyabharat.com/shantiniketan-english-school-players-get-impressive-selection-for-the-state-level-yogasana-competition/