मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
ते ४७ वर्षांचे होते. भारत-पाकिस्तान यांचा टी-२० विश्वचषकातील रविवारी झालेला सामना पाहण्यासाठी अमोल हे न्यूयॉर्क येथे गेले होते.
Related News
Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
- By अजिंक्य भारत
गेल्या मंत्रीमंडळात जो फॉर्म्युला होता तोच यावेळी लागू असायला हवा; गृहमंत्रीपदाबाबत शंभूराज देसाई स्पष्टच बोलले
- By अजिंक्य भारत
दावा- ईरानी राजदूत से मिले इलॉन मस्क:ट्रम्प की तरफ से की बात
सुशांत सिंह राजपूतची ‘ती’ इच्छा अपूर्णच राहिली; त्याच्यासोबत स्क्रिन शेअर केलेल्या अभिनेत्याचा खुलासा, काय म्हणालेला सुशांत त्याला?
Bhool Bhulaiyaa 3 Box Office Collection: फक्त ‘सिंघम अगेन’च नाही तर, ‘कंगुवा’लाही रुह बाबानं पाजलं पाणी; 14व्या दिवशीही ‘भूल भुलैया 3’चा गल्ला कोटींमध्ये
आता ‘नागिण’ बनणार ‘स्त्री’, श्रद्धा कपूरच्या आगामी बिग बजेट चित्रपटाबाबत मोठी अपडेट
शिंदेगट आणि ठाकरेगट आमनेसामने; प्रताप सरनाईक आणि नरेश मणेरा यांच्यात चुरशीची लढत
मुंबईतील बीकेसीमधील अंडरग्राऊंड मेट्रोला भीषण आग; प्रवाशांमध्ये गोंधळ
Manoj Jarange : हिंदू खतरे में तर मग मराठ्यांचे काय?
“आमचे फिश फूड स्टॉल का बंद केले?” सदा सरवणकरांवर कोळी महिला संतापली
- By अजिंक्य भारत
भारतीय रेल्वेचे एक अॅप अन् 14 सुविधा, तिकीट बुकींगपासून जेवण
- By अजिंक्य भारत
बॉयफ्रेंडचा दफनभूमीपर्यंत साथ देण्याचा शब्द, दुसऱ्या धर्मात लग्न करणार, कोण आहे ही अभिनेत्री?
- By अजिंक्य भारत
न्यूयॉर्क : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांचे सोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
ते ४७ वर्षांचे होते. भारत-पाकिस्तान यांचा टी-२० विश्वचषकातील रविवारी झालेला सामना पाहण्यासाठी
अमोल हे न्यूयॉर्क येथे गेले होते. त्यांचे एमसीएच्या पदाधिकाऱ्यांसोबतचे छायाचित्रसुद्धा
समाजमाध्यमांवर वायरल झाले आहे. मात्र सामना झाल्यानंतर रात्रीच त्यांचे न्यूयॉर्कमध्ये निधन झाल्याचे समजते.
ऑक्टोबर २०२२मध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांना पराभूत करून एमसीएच्या
अध्यक्षपदी निवड झालेले अमोल यांचे नाव क्रीडा विश्वातसह राजकीय वर्तुळातही चर्चेत आले होते.
त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची असलेली मैत्री हीदेखील
सर्वश्रुत आहे. देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे महापौर असताना अमोल काळे भाजपचे वॉर्ड अध्यक्ष होते.
अमोल यांनी एमसीएचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून मुंबई क्रिकेटच्या हितासाठी असंख्य मोलाचे निर्णय घेतले.
त्यांनी मुंबईच्या रणजीपटूंचे सामन्याचे मानधन दुप्पट केले.
तसेच रणजी विजेत्या मुंबई संघालाही कोटींच्या घरात रोख पारितोषिक जाहीर केले. नुकताच वांद्रे येथेही ‘होम
ऑफ चॅम्पियन्स’ची सुरुवात करण्यात आली. त्याशिवाय भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन
तेंडुलकरचा वानखेडे स्टेडियमवर पुतळाही त्यांच्याच कल्पनेतून साकारण्यात आला.
त्यांच्या निधनामुळे सगळीकडे शोककळा पसरली आहे…
Read Also https://ajinkyabharat.com/dhoni-has-been-visiting-france-for-the-past-few-days/