महाराष्ट्रातील ६ खासदारांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी ! आज घेतील मंत्रीपदाची शपथ..

महाराष्ट्रातील ६ खासदारांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी

राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे

NDA तील घटक पक्षांना सोबत घेऊन नरेंद्र मोदी

Related News

आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

तर मोदींसोबत एकूण ६३ नवनिर्वाचित खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

आज दिल्लीतील राष्ट्रपती भवनात भव्य शपथविधी सोहळा होणार आहे.

या शपथविधीसाठी विविध राज्यातील खासदारांना फोन आल्याची माहिती आहे.

त्यात महाराष्ट्रातील ६ खासदारांचा समावेश आहे.

यामध्ये बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले प्रतापराव जाधव,

2014 आणि 2019 च्या दोन्ही मंत्रिमंडळात सहभागी असलेले नितीन गडकरी तथा पियुष गोयल

रावेरच्या खासदार रक्षा खडसे , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे रामदास आठवले ,

पुण्याचे पहिल्यांदाच खासदार बनलेले मुरलीधर मोहोळ या खासदारांचा समावेश आहे.

Related News