विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाबद्दल गोडी निर्माण व्हावी, तसेच विविध वैज्ञानिक प्रतिकृती प्रत्यक्ष अनुभवता याव्यात, यासाठी सर सी. व्ही. रमन फिरते विज्ञान प्रदर्शन, रमन विज्ञान केंद्र आणि तारामंडळ नागपूरचे फिरते विज्ञान प्रदर्शन मुर्तिजापूर हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक 12 व 13 नोव्हेंबर रोजी शालेय प्रांगणात पाहायला मिळणार आहे.
या विज्ञान प्रदर्शनाचे आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी थाटात उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अकोला एज्युकेशन सोसायटीचे संचालक विनायकराव वारे सर, तसेच प्रमुख अतिथी म्हणून मोनाली सौंदळे , विज्ञान समन्वयक बीआरसी मुर्तिजापूर उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती म्हणून शाळेचे मुख्याध्यापक अनिल देविकर आणि शाळेचे पर्यवेक्षक दिनेश बकाले ,तसेच ज्येष्ठ विज्ञान शिक्षक मनोज दीक्षित उपस्थित होते.
विज्ञान केंद्र नागपूरकडून शुभम अजमिरे (टीम लीडर) आणि सावन राठोड (टेक्निशियन) या प्रकल्पासाठी मुख्य उपस्थित होते. विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश म्हणजे मुर्तिजापूर तालुक्यातील तसेच शहरातील विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रातील नव्या शोधांशी प्रत्यक्ष ओळख करून देणे, आणि त्यांना विज्ञान विषयात आवड निर्माण करणे.
Related News
अकोट : स्थानिक सेंट पॉल्स अकॅडमी, अकोट येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करणे आणि वैज्ञ...
Continue reading
अकोला तालुक्यातील जय बजरंग विद्यालय, चान्नी येथील विद्यार्थ्यांनी होळी सणाच्या निमित्ताने एक आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबवित ‘दुर्गुणांच्या होळीचा’ संकल्प केला. लोकमान्य टिळक स्काऊ...
Continue reading
आलेगाव प्रतिनिधी – आलेगावमधील प्रभा प्रकाश कॉन्व्हेंट शाळेत होळीचा सण यंदा पारंपरिक संस्कृतीसह पर्यावरणजागृती या दोन्ही उद्दिष्टांसाठी उत्साहात साजरा करण्यात आला. “माझी शाळा, सुंदर...
Continue reading
अकोट तालुक्यातील ग्राम बोर्डी येथील श्री नागास्वामी इंग्लिश स्कूलमध्ये बाल आनंद मेळाव्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक ज्ञाना...
Continue reading
अकोट :तालुक्यातील लोहारी खुर्द येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी ...
Continue reading
बोरगाव मंजू (प्रतिनिधी) :विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, संशोधनवृत्ती आणि सामाजिक जाणीव विकसित व्हावी, या उद्देशाने विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ...
Continue reading
पातूर (प्रतिनिधी) : पातूर तालुक्यातील चोंढी येथील महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप मो...
Continue reading
अकोट – अकोट येथील श्री शिवाजी विद्यालयात शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२७ व्या जयंती उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव दिनांक २४ ते २९ डिसे...
Continue reading
अकोला – विद्यार्थी समाजामध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण आणि खगोलशास्त्र यांसारख्या विषयांबद्दल रस निर्माण करून त्यांच्या सृजनशीलतेला चालना देण्यासाठी डॉ. सुशिलाबाई देशमुख उच्च ...
Continue reading
पातूरमध्ये रंगला आगळावेगळा शपथविधी सोहळा
किड्स पॅराडाईज स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे ‘मंत्रीमंडळ’; मुख्यमंत्र्यासह 20 मंत्र्यांनी स्वीकारली शपथ राज्यात एका बाजूने सत्ताधाऱ्यांमधील न...
Continue reading
अकोला जिल्ह्यातील पातुर तहसील कार्यालय आज 4 डिसेंबर रोजी एका अनपेक्षित घटनेमुळे तातडीने चर्चेचा केंद्रबिंदू बनले. सकाळच्या वेळेत कार्यालयाच्या परिसरात अचानक एक ड्रोन दिसून आला आणि ...
Continue reading
टाटा मोटर्सच्या कार-एसयूव्ही विक्रीत झपाट्याने वाढ, नेक्सॉन आणि पंचला सर्वोच्च पसंती नोव्हेंबर 2025 विक्री अहवाल
टाटा मोटर्सने नोव्हेंबर 2025 मध्ये आपल्या कार आणि एसयूव्ही विक्रीत...
Continue reading
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश शेगोकार यांनी केले, तर आभार प्रदर्शन चंद्रकांत राठोड यांनी सादर केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.
विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांना विविध प्रयोग, वैज्ञानिक प्रतिकृती आणि तारामंडळाबद्दल माहिती पाहता येणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्राची खरी झलक अनुभवता येईल. विज्ञान केंद्राने विद्यार्थ्यांना या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/nimba-central-level-school-sports-competition-2025-historic-victory-of-mokha-students-celebration-in-the-entire-area/