पंजाब आपला नाकारणार ?

Kajeriwal & Yogi

काँग्रेसची 7 जागांवर आघाडी, आप 3 जागांवर आघाडी

चंदीगढ : पंजाबमधील 13 लोकसभेच्या जागांसाठी 117 केंद्रांवर कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी सुरू आहे. सर्व 13 जागांवर कल येण्यास सुरुवात झाली आहे. तर पंजाबमधील 13 लोकसभा जागांवर यावेळी 328 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यामध्ये सध्या काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर असून आप 3 जागांवर तर अकाली दलाने 1 जागेवर आघाडी घेतली आहे.

जालंधरमधून चरणजीत चन्नी यांचा विजय निश्चित ?
चरणजीत चन्नी यांचा विजय निश्चित असल्याचं बोललं जात आहे, त्यांनी जालंधर मधून 121979 मतांनी पुढे लीड घेतली आहे. तर लुधियानाच्या जागेवर काँग्रेसचे राजा वाडिंग 72761 मतांनी, भाजपचे रवनीत सिंह बिट्टू 67554 मतांनी, आपचे अशोक पराशर पप्पी 51984 मतांनी तर अकाली दलाचे रणजीत सिंह धिल्लन 21916 मतांनी आघाडीवर आहेत. पटियालामधून काँग्रेसचे धरमवीर गांधी आघाडीवर आहेत, तर भाजपच्या प्रनीत कौर मागे आहेत. खादूर साहिबमधून अपक्ष उमेदवार अमृतपाल सिंग 113456 मतांनी पुढे आहेत. गुरुदासपूरमधून काँग्रेसचे सुखजिंदर रंधवा 9122 मतांनी पुढे आहेत.

Related News

आपला पंजाबची जनता नाकारणार ?

आपल्याला माहीत आहे की पंजाब हा पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आप ने जोरदार मुसंडी मारत पंजाबमध्ये सत्ता स्थापन केली. परंतु आता पुन्हा एकदा पंजाबमध्ये कॉँग्रेस लोकसभेच्या माध्यमातून आपले वर्चस्व निर्माण करेल का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

Related News