आयपीएलचा थरार संपल्यानंतर आता 1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कपचा (T 20 World Cup) थरार रंगणार आहे.
अमेरिका आणि वेस्ट इंडिजकडून टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन केलं जाणार आहे. या स्पर्धेत 20 संघ सहभागी होणार आहेत.
Related News
135 कोटींच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात ED ची मोठी कारवाई; मुंबई-छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा ठिकाणी छापे
छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 135 कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणूक प्रकरणात अं...
Continue reading
Instagram चे नवे फीचर; टॅग केलेले आवडते फोटो आता थेट प्रोफाइल ग्रिडवर दाखवा, जाणून घ्या कसे वापरायचे
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram आपल्या यूजर्सच...
Continue reading
सीजेपी नेत्याचे सरकारवर गंभीर आरोप; सोशल मीडिया कंपन्यांवर दबाव असल्याचा दावा
कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी केंद्र सरकार ...
Continue reading
मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनावर सरकारची पहिली प्रतिक्रिया; बावनकुळेंनी स्पष्ट केली भूमिका
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागण...
Continue reading
अभिजीत दीपकेंना मोठा झटका? सरकारी शाळांमध्ये ‘नो एंट्री’; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश
राजस्थान-उत्तर प्रदेशातील सरकारी शाळांमध्ये बाहेरील व्यक्ती, पत्रकार आणि यूट्यूबर्सना पूर्...
Continue reading
Elon Musk यांच्या ‘X’ला मोठा धक्का? जुन्या Twitter ची पुन्हा एंट्री; माजी कर्मचाऱ्यांनीच उभारले ‘Twitter.now’
सोशल मीडिया विश्वात पुन्हा एकदा ‘Twitter’ या नावाची चर्चा सुरू झाली आ...
Continue reading
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा डबल झटका! दूध आणि ऑटो-टॅक्सी प्रवास महागणार; सप्टेंबरपासून खर्च वाढण्याची शक्यता
सप्टेंबर महिना सुरू होताच मुंबईकरांच्या घ...
Continue reading
ओमराजे निंबाळकर यांना सोशल मीडियावर फटका; तब्बल 35 हजार फॉलोअर्स घटले, ठाकरेंना अनफॉलो केल्यानंतर चर्चांना उधाण
धाराशिव : धाराशिवचे खासदार ओमराजे निंब...
Continue reading
Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांचा भाजपवर निशाणा; म्हणाले, ‘राम रहीम बाबाचा फोटो लावा आता…’
Abhijeet Dipke CJP Founder : कॉकरोच जनत...
Continue reading
रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात मोठी कारवाई; दिपाली सय्यद, सुषमा अंधारे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल!
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या...
Continue reading
Mumbai : मुंबईत हुंडा छळाच्या तक्रारींमध्ये 5.7 टक्क्यांनी वाढ; मात्र हुंडाबळी आणि आत्महत्यांमध्ये मोठी घट
Mumbai : मुंबईत विवाहित महिलांच्या हुंड्यासा...
Continue reading
टेन्शन वाढले! गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, संशयही नाही; खलिस्तानी नेटवर्कची भरतीची नवी पद्धत
खलिस्तान समर्थक दहशतवादी संघटनांच्या भरतीच्या पद्धतीत बदल हो...
Continue reading
प्रत्येकी पाच संघ प्रमाणं चार गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत(India), पाकिस्तान, अमेरिका, आयरलँड, कॅनडा या संघांचा गट अ मध्ये
समावेश करण्यात आला आहे. टी-20 वर्ल्ड कपचे सराव सामने सुरु झाले
आहेत. या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा माजी कॅप्टन इयॉन मॉर्गननं मोठं वक्तव्य केलं आहे.
इंग्लंडचा माजी कॅप्टन इयॉन मॉर्गननं टी- 20 वर्ल्ड कप 2024 साठी बेस्ट टीम म्हणून भारतीय संघाचं नाव घेतलं आहे.
भारतीय संघाकडे चांगले खेळाडू आहे.
भारतीय संघाला खेळाडूंच्या दुखापतीचा सामना करावा लागला तरी ती टीम मजबूत आहे.
जे टीममध्ये नाहीत त्यांच्याबाबत देखील आपण चर्चा करु शकतो, असं मॉर्गन म्हटला.
इयॉन मॉर्गननं स्काई स्पोर्टस विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं. ही स्पर्धा कठीण असणार आहे.
या स्पर्धेत आतापर्यंत वेस्ट इंडिज आणि इंग्लंडनं दोनवेळा विजेतेपद पटकवलं आहे.
भारतानं एकदा विजेतेपद मिळवलं आहे. श्रीलंका, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियानं देखील एकदा विजेतेपद मिळवलेलं आहे.
टी20 वर्ल्ड कपसाठी एक आठवडा बाकी असताना इयॉन मॉर्गनला कॅरेबियन आणि अमेरिकन वातावरणात तुम्हाला बेस्ट टीम कोणती वाटते
असा प्रश्न विचारण्यात आला. यावर इयॉन मॉर्गननं स्पष्टपणे भारतीय टीम फेवरिट असल्याचं म्हटलं.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला दुखापतीचा सामना करावा लागला तरी सर्वात मजबूत टीम भारताची आहे.
भारतीय संघाची ताकद, क्षमता, त्यांच्या मजबूत फलंदाजी अविश्वसनीय आहे.
टीम इंडियाचे काही खेळाडू गुणवत्ता असून देखील टॉप 15 च्या बाहेर आहेत.
भारतानं 2007 मध्ये पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर ते एकदाही विजेतेपद मिळवू शकले नाहीत
हे पण वास्तव असल्याचं मॉर्गननं म्हटलं. टीम इंडियामध्ये क्वालिटी असून कागदावर देखील
ते मजबूत टीम आहेत. भारतीय संघ कोणत्याही संघाला चांगला खेळ करुन पराभूत करु शकतात.
भारतीय संघाचा पहिला सामना 5 जूनला आयरलँड विरुद्ध होणार आहे. 9 जूनला भारत आणि पाकिस्तान
अशी हाय व्होल्टेज लढत न्यूयॉर्कमध्ये होणार आहे.
12 जूनला भारत आणि अमेरिका तर 15 जूनला भारत आणि कॅनडा यांच्यात मॅच होईल.