राधिका मर्चंट यांच्या पहिल्या प्री-वेडिंगनंतर आता दुसऱ्या प्री-वेडिंगची जोरदार चर्चा रंगली आहे.
अनंत-राधिकाचा हा दुसरा प्री-वेडिंग सोहळा चार दिवस रंगणार आहे. २९ मेला सुरू होऊन १ जूनपर्यंत असणार आहे.
Related News
पण हा दुसरा प्री-वेडिंग सोहळा परदेशात मोठ्या थाटामाटात चक्क क्रूझवर पार पडणार आहे.
अनंत-राधिका पहिला प्री-वेडिंग सोहळा गुजरात येथील जामगरमध्ये झाला होता.
या सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. बॉलीवूड कलाकारांची तर
मांदियाळीचं पाहायला मिळाली. आताही दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये बॉलीवूड कलाकार सहभागी होणार आहेत. विशेष
म्हणजे इटली ते फ्रान्स असा प्रवास करत अनंत-राधिकाचा दुसरा प्री-वेडिंग पार पडणार आहे.
याच बहुचर्चित दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्याचा पहिला-वहिला फोटो समोर आला आहे.
बॉलिवूड सेलिब्रिटींचा खास मित्र ओरहान अवतारमणी उर्फ ओरीने क्रूझवरील पहिला फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
या फोटोमध्ये आलिशान क्रूझ पाहायला मिळत आहे.
कूझमधून सुंदर निर्सगाचं दर्शन होतं आहे.
समुद्राच्या लाटा आणि मावळतीचा सूर्याचं अप्रतिम दृश्य दिसत आहे. याशिवाय क्रूझच्या आतमध्ये एका टेबलवर हुक्का पॉट,
काचेच ग्लास ठेवलेले पाहायला मिळत आहेत. ही फक्त क्रूझची एक छोटी झलक आहे
, जी पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. आता संपूर्ण क्रूझ कशी असेल या विचार करूनही हैराण व्हायला होतं.
दरम्यान, अभिनेता सलमान खान, रणवीर सिंग, रणबीर कपूर-आलिया भट्ट असे बरेच कलाकार काल इटलीला रवाना झाले.
शिवाय अंबानी व मर्चंट कुटुंबातील सदस्य देखील रवाना झाले.
अनंत-राधिकाचा हा बहुचर्चित दुसरा प्री-वेडिंग सोहळा सुरू होण्यासासाठी अवघे काही तास बाकी आहेत.
अनंत-राधिकाच्या पहिल्या प्री-वेडिंग सोहळ्याच्या पहिल्या दिवशी,
१ मार्चला जगप्रसिद्ध पॉप स्टार रिहानाचा परफॉर्मन्स झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संगीत
सोहळा झाला. यामध्ये बॉलीवूडच्या सेलिब्रिटींनी जबरदस्त परफॉर्मन्स केला. बॉलीवूडचे तीन
खान ‘नाटू नाटू’ या गाण्यावर डान्स करताना दिसले. तिसऱ्या दिवशी, ३ मार्चला ‘टस्कर ट्रेल्स’
आणि ‘हस्ताक्षर’ कार्यक्रम झाला. ‘टस्कर ट्रेल्स’ हा आउटडोअर कार्यक्रम होता
. ज्याद्वारे पाहुण्यांना जामनगर, वनतारा फिरवलं. त्यानंतर रात्री भव्य महाआरती आणि
अनंत-राधिका यांची हस्ताक्षर सेरेमनी पार पडली. या सोहळ्याला १२०० पाहुण्यांनी उपस्थितीत लावली होती.
Read Also https://ajinkyabharat.com/mother-deepika-padukones-yellow-dress-sold-for-how-much/