एमसी स्टॅनची धक्कादायक पोस्ट पाहून चाहते चिंतेत

मसी स्टॅन

MC Stan : एमसी स्टॅन देवाकडून का करतोय मृत्यूची मागणी? रॅपरची क्रिप्टिक पोस्ट पाहून चाहते चिंतेत…

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पुण्याचा प्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅन याची चर्चा.

एमसी स्टॅन पोस्ट शेअर करत म्हणाला, ‘अल्लाह मौत दे…’

बिग बॉस 16 चा विजेता आणि पुण्याचा प्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅन ऊर्फ

अल्ताफ शेख त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

एमसी स्टॅन याने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे रॅपर तुफान चर्चेत आला आहे.

एमसी स्टॅन याची पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.

सध्या सर्वत्र एमसी स्टॅन याच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

एमसी स्टॅन पोस्टमध्ये देवाकडे मृत्यूची मगणी करताना दिसत आहे.

एमसी स्टॅन याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं आहे, ‘

अल्लाह बस मौत दे…’ सध्या एमसी स्टॅन याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

एमसी स्टॅन याची पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. चाहते एनसी स्टॅन याला नक्की काय झालं आहे?

असं विचारताना दिसत आहेत. एक नेटकरी म्हणाला, ‘भाईला नक्की झालं तरी काय आहे?’

दुसरा नेटकरी म्हणाला, ‘असं काहीही करू नको, तुझ्या चाहत्यांचा विचार कर…

सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी एमसी स्टॅन याच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला होता. सांगायचं झालं,

बिग बॉस स्टॅनविषयी छोट्यातली छोटी गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. पण आता एमसी स्टॅन याने चाहत्यांची चिंता वाढवली आहे.

सोशल मीडियावर एमसी स्टॅन कायम चर्चेत असतो. आज एमसी स्टॅन याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे

. एमसी स्टॅन याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते

. एमसी स्टॅन कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

इन्स्टाग्रामवर एमसी स्टॅन याने 10.9 मिलियन फॉलोअर्स आहेत.

एमसी स्टॅन त्याच्या महागड्या वस्तूंमुळे देखील चर्चेत असतो.

बिग बॉसच्या घरात एमसी स्टॅन याच्या चेन आणि ड्रेसिंग स्टाईलने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

सांगायचं झालं तर, बिग बॉसच्या घरात एमसी स्टॅन 80 हजार रुपयांचे बूट आणि दीड कोटी रुपयांची चेनची तुफान चर्चा रंगली.

सलमान खान देखील एमसी स्टॅन याच्या महागड्या वस्तूंवर वक्तव्य करायचा.

पण आता एमसी स्टॅन त्याच्या क्रिप्टिक पोस्टमुळे चर्चेत आला आहे.